भारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांना मधुमेह

भारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांना मधुमेह

आज जागतिक मधुमेह दिन. यानिमित्तानं केलेल्या एका अभ्यासात धक्कादायक आकडेवारी उघड झालीये. भारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांना मधुमेह आहे, भारतात 6 कोटी 92 लाख महिलांना मधुमेहाचा त्रास आहे, पण गर्भवती महिलांमध्ये याचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलंय.

  • Share this:

14 नोव्हेंबर : आज जागतिक मधुमेह दिन. यानिमित्तानं केलेल्या एका अभ्यासात धक्कादायक आकडेवारी उघड झालीये. भारतात तब्बल 20 टक्के गर्भवती महिलांना मधुमेह आहे, भारतात 6 कोटी 92 लाख महिलांना मधुमेहाचा त्रास आहे, पण गर्भवती महिलांमध्ये याचं प्रमाण अधिक असल्याचं आढळलंय.

Indian Institute for Diabetics या संस्थेनं हा अभ्यास केलाय. कामाचा ताण आणि आरोग्याकडे दुर्लक्ष ही यामागची प्रमुख कारणं आहेत.आणि हो, शहरी आणि ग्रामीण, दोन्ही भागांतल्या महिलांना याचा त्रास असल्याचं समोर आलंय.

पुरुषप्रधान संस्कृतीत एकूणच महिलांच्या आजाराकडे दुर्लक्ष होत असून खाण्यापिण्याच्या सवयी आणि कौटुंबिक जबाबदारी यामुळे महिलांमधील मधुमेहाचे प्रमाण वाढताना दिसतंय.

आयआयडीची धक्कादायक आकडेवारी

- भारतात 10% नागरिकांना मधुमेह

- 6.92 कोटी महिलांना मधुमेह

- गर्भवती महिलांमध्ये प्रमाण अधिक

- 20% गर्भवती महिलांना मधुमेह

- कामाच्या ताणामुळे मधुमेहाच्या प्रमाणात वाढ

- आरोग्याकडे दुर्लक्ष प्रमुख कारणांपैकी एक

- शहरी आणि ग्रामीण भागातल्या महिलांचा समावेश

- वेळोवेळी चाचणी करा, डॉक्टरांचा सल्ला

First Published: Nov 14, 2017 01:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading