Home /News /lifestyle /

चांदोबाच्या गावात चिमुकल्याचं नाव; 2 वर्षांचा मुलगा चंद्रावरील जमिनीचा झाला मालक

चांदोबाच्या गावात चिमुकल्याचं नाव; 2 वर्षांचा मुलगा चंद्रावरील जमिनीचा झाला मालक

वडिलांनी मुलाला बर्थ डे गिफ्ट म्हणून दिला चंद्राचा तुकडा.

    भोपाळ, 18 डिसेंबर : चांदोबा, चांदोबा भागलास का... आपल्यापैकी बरेच जण हेच गाणं बडबडत लहानाचे मोठे झालो आणि आताही बरीच मुलं हे गाणं गुणगुणतात. नकळत्या वयात आकाशातील चंद्राची आपल्यासाठी पहिली ओळख म्हणजे आपला चांदोमामा...पण याच चांदोमामाच्या गावात एका चिमुकल्याचं नाव झळकलं आहे (2 year old boy's owner of moon land). दोन वर्षांचा चिमुकला चक्क चंद्रावरील जमिनीचा मालक झाला आहे (2 year old boy's land on moon). मध्य प्रदेशच्या सतनातील  एका व्यक्तीने आपल्या दोन वर्षांच्या लेकाला त्याची वाढदिवसाची भेट म्हणून चक्क चंद्राचा तुकडा दिला आहे. भरहूतनगरमध्ये राहणारे अभिलाष मिश्रा बंगळुरूतील एका कंपनीत रिजनल मॅनेजर पदावर काम करतात. लोक चंद्रावर जमीन खरेदी करत आहेत, याची माहिती त्यांना ऑफिसमध्ये मिळाली. त्यानंतर त्यांनीही आपण चंद्रावर जमीन खरेदी करण्याचं ठरवलं. त्यांनी इंटरनेटवर याबाबत सर्च केलं. तेव्हा अमेरिकेतील एक कंपनी चंद्रावर जमीन विकण्याचं काम करते, याची माहिती त्यांना मिळाली.  चंद्रावर जमीन विकत असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेतील कंपनीशी अभिलाष यांनी संपर्क केला. कंपनीकडून त्यांना चंद्रावर 12 साइट आहेत, ज्या तुम्ही तुमच्या मर्जीने खरेदी करू शकता, असं सांगितलं. फर्मच्या वेबसाईटवर ही 12 ठिकाणं दाखवण्यातही आली, ज्याचे दर एकरनुसार होते. हे वाचा - OMG! वयाच्या पहिल्या वर्षातच चिमुकला भलताच मोठा झाला; लेकाला पाहून आईही शॉक अभिलाष यांनी आपला दोन वर्षांचा मुलगा अव्यानच्या नावाने जमीन खरेदी करण्याचं ठरवलं. त्यांनी आवश्यक ती किंमत दिली आणि इंटरनेशनल लूनर लँड्स रजिस्ट्री नावाच्या कंपनीने नोंद केली. कंपनीने त्यांना रजिस्ट्री, सर्टिफिकेट आणि काही दस्तावेज पाठवले. चंद्रावरील या जमिनीचा मालकी हक्कही मुलाच्या वाढदिवशी म्हणजे  15 डिसेंबरला मिळाला.  त्यानंतर अभिलाष यांनी चंद्राचा तुकडा आपल्या मुलाच्या बर्थडे दिवशी त्याला गिफ्ट केला. अभिलाषने याबाबत घरात कुणालाच सांगितलं नव्हतं. त्यांना सर्वांना सरप्राईझ द्यायचं होतं. हे वाचा - अजबच! ना परफ्युम वापरत ना डिओ; तरी या महिलेच्या शरीरातून येतो सुगंध आज तकच्या रिपोर्टनुसार अभिलाष यांनी सांगितलं, आम्ही आमच्या चंद्रासारख्या मुलाला चंद्रावर जमीन दिली आहे. आमच्यासाठी हे खूप अभिमानास्पद आहे. या जमिनीची कागदपत्रंही अव्यानच्या वाढदिवशी म्हणजे  15 डिसेंबरचीच आहे. जमिनीच्या अधिकारासह त्याला चंद्रावर नागरिकत्वही मिळालं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Madhya pradesh, Moon, Parents and child

    पुढील बातम्या