मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

महाराष्ट्राच्या कोल्हापुरीला लखनवी साज! 2 बहिणींनी 300 रुपयात उभारला चपलांचा व्यवसाय, आज आहे 3 लाखांची कमाई

महाराष्ट्राच्या कोल्हापुरीला लखनवी साज! 2 बहिणींनी 300 रुपयात उभारला चपलांचा व्यवसाय, आज आहे 3 लाखांची कमाई

ऑनलाईन खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता आणि भावाकडून ऑनलाईन बिझनेस कसा करायचा याबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी स्वत:चा चपलांचा व्यवसाय सुरु केला आहे. तो ही थेट कोल्हापुरी चपलांचा..!

ऑनलाईन खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता आणि भावाकडून ऑनलाईन बिझनेस कसा करायचा याबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी स्वत:चा चपलांचा व्यवसाय सुरु केला आहे. तो ही थेट कोल्हापुरी चपलांचा..!

ऑनलाईन खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता आणि भावाकडून ऑनलाईन बिझनेस कसा करायचा याबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी स्वत:चा चपलांचा व्यवसाय सुरु केला आहे. तो ही थेट कोल्हापुरी चपलांचा..!

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

लखनऊ, 12 फेब्रुवारी: कमी वयात स्वत:चा व्यवसाय सुरु करुन या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई करणे म्हणजे खरंच कौतुकास्पद आहे. ऑनलाईन खरेदीची वाढती मागणी लक्षात घेता आणि भावाकडून ऑनलाईन बिझनेस कसा करायचा याबद्दल मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्तर प्रदेशच्या लखनऊ येथे राहणाऱ्या दोन सख्या बहिणींनी स्वत:चा चपलांचा व्यवसाय सुरु केला आहे. अवघ्या 300 रुपयांच्या एका चपलेमुळे या बहिणींना बिझनेस करण्यासाठी प्रेरणा मिळाली. फक्त भारतातच नाही तर जगभरात या बहिणींनी तयार केलेल्या चपलांना खूप मागणी आहे. प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त चपलांची मागणी असते. या व्यवसायातून त्या वर्षाला 3 लाख रुपयांपेक्षा जास्त कमाई करतात.

महाराष्ट्रातील कोल्हापुरी चपलांना बाजारात प्रचंड मागणी असल्याचं लक्षात आल्यानंतर या बहिणींना कोल्हापुरी चप्पलना डिझायनर लूक देऊन त्यांची विक्रीही सुरू केली. दैनिक भास्करने याबाबत वृत्त दिले आहे.

लखनऊ येथे राहणाऱ्या 27 वर्षांच्या नाजिशने आपल्या बहिणीबरोबर चपलांचा व्यवसाय सुरू केला आहे. नाजिशच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. तिचे आई-वडील टेलरिंगचं दुकान चालवायचे. त्यांनी दोन्ही बहिणींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रीत करत त्यांना शिक्षणासाठी काहीच कमी पडून दिले नाही. गरज पडल्यास त्यांनी दोघींच्या शिक्षणासाठी दुसऱ्यांकडून उधारी सुद्धा घेतली. नाजिश अभ्यासात हुशार होती तिला चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा बँकेत अधिकारी व्हायचे होते. पण 2016 मध्ये तिला तिच्या भावाकडून ऑनलाईन बिझनेसबद्दल माहिती मिळाली. तिच्या भावाने तिला येणाऱ्या काळात ऑनलाईन सेक्टरमध्ये बरीच वाढ होणार असून बरेच मार्केट ऑनलाईन शिफ्ट होणार आहेत. त्यामुळे आपण या क्षेत्रात काहीतरी केले पाहिजे असे सांगितले.

(हे वाचा-मकर, कुंभ आणि मीन राशीवाले प्रेमात कसे असतात आणि कोण असतो यांचा परफेक्ट जोडीदार?)

नाजिशने सांगितले की, 'आम्ही आधीपासूनच घरामध्ये चप्पल आणि सँडेल्स तयार करायचो आणि स्वत:च्या मनाप्रमाणे त्याला डिझाइन करायचो. आसपास राहणारी लोकं आमच्या क्रिएटिव्हिटीचे खूप कौतुक करायचे. आम्ही विचार केला की आपण याचा व्यवसाय का नाही करु शकत. यानंतर आम्ही कोल्हापुरी सँडेल्सवर क्रिएटिव्ह डिझाइन तयार करण्याचे काम सुरु केले कारण आपल्याकडे कोल्हापुरी चप्पल आणि सँडेल्सला चांगली मागणी आहे. मी आणि माझी छोटी बहीण इंशाने या कामाला सुरुवात केली.'

मीडिया अहवालानुसार, नाजिशने तिच्या आईकडून 300 रुपये घेऊन मार्केटमधून एक सँडेल खरेदी केला. या सँडेलवर आपल्या मनाप्रमाणे क्रिएटिव्ह डिझाइन तयार केले. त्याच्या फॅब्रिकचा लूक बदलला आणि त्याचा फोटो काढून इन्स्टाग्रामवर पोस्ट केला. फोटो पोस्ट केल्यानंतर एका महिन्यानंतर नाजिशला पहिली ऑर्डर मिळाली. त्यामुळे दोन्ही बहिणींचे मनोबल वाढले आणि त्यांनी या कल्पनेला उच्च स्तरावर घेऊन जाण्याचा प्लॅन केला. त्यांनी सोशल मीडियावर 'Talking Toe' नावाचे स्वत:चे पेज तयार केले आणि त्यावर त्यांनी डिझाइन केलेले सँडेल्सचे फोटो पोस्ट केले. हळूहळू त्याचा व्यवसाय वाढत गेला. त्यांना दुबई, अमेरिका, यूके, इटली, सिंगापूर आणि मॉरिशसवरुन चपलांसाठी ऑर्डर येऊ लागल्या.

दोन्ही बहिणींनी मिळून आतापर्यंत 15 हजारांपेक्षा जास्त डिझाइन तयार केले आहेत. नाजिशने आपल्यासोबत 4 जणांना कामासाठी ठेवले असून त्यांना महिन्याला 10 हजार रुपये पगार देते.

कोल्हापुरी चपलांची मागणी

भारतामध्ये कोल्हापुरी चप्पलांची खूप मागणी आहे. 25 लाखांपेक्षा अधिक जण हा व्यवसाय करतात. कोल्हापुरी चप्पलांची वाढती मागणी पाहता नाजिश या चपलांवर सुद्धा क्रिएटिव्ह डिझाइन तयार करु लागली. ती मार्केटमधून कोल्हापुरी चपला खरेदी करुन आणते. डिझाइनचे सँपल तयार करते आणि त्यांनी तयार केलेल्या डिझाइननुसार कोल्हापुरी सँडेल्सला क्रिएटिव्ह करते. फॅशन्स आणि ट्रेंडनुसार या सँडेल्सवर क्रिएटिव्ह काम केले जाते. जसं कपड्यांवर फॅब्रिकेटेड डिझाइन केले जाते अशाच पद्धतीने चपलांना सुद्धा क्रिएटिव्ह डिझाइन केले जात असल्याचे तिने सांगितले.

(हे वाचा-गच्चीवर केशराची शेती करत दोघांनी लाखो कमावले, युट्युब गुगलला बनवलं गुरू!)

नाजिशने पुढे सांगितले की, 'आम्ही मार्केटिंगसाठी सोशल मीडियाचा सर्वात जास्त वापर करत आहोत. सध्याच्या काळामध्ये लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया प्रभावी माध्यम आहे. आम्ही सोशल मीडियाच्या सर्वच प्लॅटफॉर्म्सवर आमचे पेज तयार केले आहे. यासोबतच वेगवेगळ्या शहरामध्ये आम्ही प्रदर्शन सुद्धा भरवतो. आम्ही बॉलिवूड सेलिब्रिटींना देखील भेटतो. त्यांच्या मागणीनुसार आम्ही ऑर्डर घेतो. विद्या बालन, सारा अली खान, परिणीती चोप्रासह अनेक सेलब्रिटींना आम्ही भेटलो आहोत. हे सेलिब्रिटी आम्ही तयार केलेल्या चपला वापरतात.'

First published:

Tags: Business News, Employment, Inspiration, Money, Small business, Women empowerment