Home /News /lifestyle /

शॉर्टकट की स्टंट? 25 व्या मजल्यावरून उडी मारली आणि... धडकी भरवणारा VIDEO VIRAL

शॉर्टकट की स्टंट? 25 व्या मजल्यावरून उडी मारली आणि... धडकी भरवणारा VIDEO VIRAL

काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social media viral video) झाला आहे.

    वॉशिंग्टन, 04 जानेवारी  : सोशल मीडियावर (social media) बरेच स्टंट्स आणि काळजात धडकी भरवणारे व्हिडीओ व्हायरल (video virla) होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दोन व्यक्ती 25 व्या मजल्यावरून उडी मारतात. हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणारी व्यक्ती जेव्हा बिल्डिंगखाली वाकून पाहते तेव्हा मात्र तिच्या जिवात जीव येतो. हा धडकी भरवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा अमेरिकेतील व्हिडीओ आहे. नॅशविले ग्रँड हयात हॉटेलमधील हे दृश्यं आहे.  या हॉटेलमध्ये 25 व्या मजल्यावर काही लोक पार्टी करत आहेत. तेव्हा दोन व्यक्ती एकत्ररित्या छताच्या रेलिंगवर उभे राहतात आणि तिथून उडी मारतात. त्यांच्या आजूबाजूला असलेले लोकही ओरडत असल्याचं ऐकायलं येतं आहे. व्हिडीओ पाहू शकतात दोन व्यक्ती आधी एका टेबलवर चढतात तिथून त्या रेलिंगवर चढतात. त्यातील एका व्यक्तीचा पाय सुरूवातीला रेलिंगवरून घसरतो ती व्यक्ती पुन्हा रेलिंगवर उभी राहते. त्यानंतर एकामागो माग एक अशा या दोन्ही व्यक्ती खाली उडी मारतात. हे वाचा - टोल राहिला बाजूलाच ट्रकनं थेट टोल नाक्यालाच उडवलं, पाहा भीषण अपघाताचा CCTV VIDEO तिथं उपस्थित असलेली एक महिला या दोघांचाही व्हिडीओ बनवते. तीसुद्धा खूप घाबरली आहे. या व्यक्तींनी उडी मारताच ती लगेच त्या रेलिंगजवळ जाऊन खाली डोकावून पाहते. तर त्या व्यक्तीना काहीही झालेलं नसतं. कारण त्यांनी पॅराशूट खोललेलं असतं. एक व्यक्ती हॉटेलखालील रस्त्यावर उतरते तर दुसरी व्यक्ती रस्त्याच्या पलीकडे असलेल्या ठिकाणी जाते. हे वाचा - दुबईच्या प्रिन्सची शहामृगासोबत शर्यत; VIDEO पाहून तुम्हीच सांगा विजेता कोण? ते दोघंही सुखरूप जमिनीवर उतरतात. तेव्हा कुठे या महिलेच्या जीवात जीव येतो. ती सुटकेच्या निःश्वास टाकते. या व्यक्ती कोण आहेत याबाबत अद्याप काही माहिती नाही. पण ते ग्रँड हयात हॉटेलमधील गेस्ट होते असं सांगितलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Social media viral, Viral, Viral videos

    पुढील बातम्या