Home /News /lifestyle /

ना Baby Bump, ना Pregnancy Symptoms; 18 वर्षांच्या तरुणीच्या अचानक पोटात दुखू लागलं आणि जन्माला आलं बाळ

ना Baby Bump, ना Pregnancy Symptoms; 18 वर्षांच्या तरुणीच्या अचानक पोटात दुखू लागलं आणि जन्माला आलं बाळ

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

18 वर्षांच्या तरुणीच्या पोटात रात्रभर दुखत होतं. बद्धकोष्ठतेमुळे असावं असं तिला वाटलं पण सकाळी तिने एका बाळाला जन्म दिला.

    लंडन, 12 मे : प्रेग्नन्सी म्हटलं की त्याची बरीच लक्षणं दिसतात. मासिक पाळी चुकणं ही पहिलं लक्षण. त्यानंतर उलटी, मळमळ, चक्कर येणं अशी लक्षणंही दिसून येतात. शिवाय प्रेग्नंट महिलांचं बेबी बम्प दिसतं. पण यापैकी काहीच न होता (Pregnancy Without Symptoms) एका महिलेने अचानक एका बाळाला जन्म दिला. यामुळे तिलाही धक्का बसला बाळ होईपर्यंत आपण प्रेग्नंट आहोत, याची माहिती तिलाच नव्हती (Woman Gave Birth to Surprise Baby). 18 वर्षांची नाओमी थॉमसच्या (Niomi Thomas ) पोटात अचानक दुखू लागलं. रात्री तिच्या पोटात तीव्र वेदना होत होत्या. बद्धकोष्ठतेमुळे वेदना व्हाव्यात तशा या वेदना होत्या, असं तिने सांगितलं. तिने वेदनाशामक औषधंही घेतली. पण त्या कमी होण्याऐवजी उलट अधिक वाढू लागल्या. सकाळपर्यंत या वेदना अधिक तीव्र झाल्या. तिला बसता येत नव्हतं की उभं राहता येत नव्हतं. बरेच तास वेदना सहन केल्यानंतर तिने एक जोरात पुश केलं आणि त्यानंतर तिला थोडा आराम मिळाला पण तिला जे दिसलं ते पाहून तिला धक्का बसला. कारण तिच्याजवळ चक्क एक बाळ होतं. ज्या बाळाला तिने नुकताच जन्म दिला होता (Baby Birth Without Symptoms). हे वाचा - OMG! इवल्याशा हातांनी उडवलं भलंमोठं प्लेन, अवघ्या 7 वर्षांच्या चिमुकल्याने घेतली आकाशात झेप; पाहा VIDEO तिला होत असलेल्या पोटातील वेदना या प्रसूती कळा होत्या. जेव्हा बाळ जन्माला आलं तेव्हा तिच्या या वेदना थांबल्या. पण आपल्या या प्रेग्न्सीमुळे नाओमीच शॉक झाली. कारण आपण प्रेग्नंट आहोत हे तिलाच माहिती नव्हतं. द सनच्या रिपोर्टनुसार प्रेग्नंट असल्याची किंचितशीही कल्पना नाओमीला नव्हती. तिच्यात प्रेग्नन्सीची कोणतीच लक्षणं नव्हती. तिचं बेबी बम्पही नव्हतं.  शिवाय ती गर्भनिरोधक गोळ्याही घेत होती. अचानक झालेल्या डिलीव्हरीमुळे तिला धक्का बसला पण आनंदही झाला. प्रेग्नन्सीच्या लक्षणांशिवाय बाळ जन्माला येण्याचं हे पहिलं प्रकरण नाही याआधीही अशी काही प्रकरणं समोर आली आहेत. हे वाचा - SO SWEET! या पोपटाचं टॅलेंट पाहून सर्वजण झाले थक्क; एकदा पाहाच हा VIDEO डेली मेलच्या रिपोर्टनुसार याला क्रिप्टीक प्रेग्नन्सी (cryptic pregnancy) किंवा प्रेग्नन्सी डिनाइल (pregnancy denial)  म्हणतात. तरुण महिला ज्या कधी प्रेग्नंट झाल्या नाहीत किंवा अशा महिला ज्यांना आपली रजोनिवृत्ती जवळ आली असं वाटतं किंवा ज्या गर्भनिरोधक वापरत नाही अशा महिलांमध्ये अशी प्रेग्नन्सी दिसून येते. पण एखाद दिवशी गोळी घणं राहिलं किंवा डायरिया असेल तर अशी प्रेग्न्सी होऊ शकते. अनियंत्रित मासिक पाळी असलेल्या महिलांनादेखील त्या प्रेग्नंट आहेत, अशी लक्षणं दिसून येत नाहीत. ज्यांना पीसीओएसची समस्या आहे आणि ज्यांच्यामध्ये हार्मोन्स अनियंत्रित आहेत. अशा महिलांमध्येसुद्धा अशी प्रेग्नन्सी होते.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Lifestyle, Pregnancy, Viral, Viral news

    पुढील बातम्या