पाहताच क्षणी प्रेग्नंट वाटावी इतकं मोठं झालं होतं पोट; ऑपरेशननंतर बसला मोठा धक्का

पाहताच क्षणी प्रेग्नंट वाटावी इतकं मोठं झालं होतं पोट; ऑपरेशननंतर बसला मोठा धक्का

ही महिला गेल्या दोन महिन्यांपासून पोट वाढत असल्यानं चिंतेत होती. पोटाचा आकारही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं तिला श्वास घेणं, उठणं-बसणं अशा क्रिया करतानाही खूप त्रास होत होता.

  • Share this:

इंदोर, 28 जानेवारी :  मध्य प्रदेशच्या (madhya pradesh) देवासमध्ये (Dewas) राहणारी 45 वर्षाची महिला  गेल्या दोन महिन्यांपासून पोट वाढत असल्यानं चिंतेत होती. पोटाचा आकारही मोठ्या प्रमाणात वाढल्यानं तिला श्वास घेणं, उठणं-बसणं अशा क्रिया करतानाही खूप त्रास होत होता. पाहताच क्षणी कुणालाही वाटेल की ती प्रेग्नंट आहे. पण तपासणीत जे काही दिसलं त्यामुळे मोठा धक्का बसला.

पोटाचा आकार वाढलेली 45 वर्षाची ही महिला रुग्णालयात गेली. तिचं एमआरआय स्कॅन (MRI Scan) करण्यात आलं. तेव्हा तिच्या अंडाशयात (Overies) मोठी गाठ ((Lump) असल्याचं दिसून आलं. त्यामुळं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. महिला डॉक्टरांनी अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वी या महिलेला जीवदान दिलं आहे.

ऑपरेशनआधी तिच्या रक्तातील साखर नियंत्रित करणं आवश्यक होतं. याकरता डॉक्टरांनी तिला एक महिना हॉस्पिटलमध्ये आपल्या निगराणीखाली ठेवून तिची साखर योग्य पातळीवर आणली आणि त्यानंतर गुरुवारी ही शस्त्रक्रिया करण्यात आली. गुरुवारी  महिलेच्या अंडाशयातून  तब्बल 17 किलो वजनाची गाठ (Lump of 17 kg) काढली. ही गाठ इतकी मोठी होती की तिचं वजन करायला नवजात बालकाचं वजन करायला वापरतात त्या वजनकाट्याऐवजी दुसरा मोठा वजनकाटा आणावा लागला.

हे वाचा -  विआनला रस्त्यावर आणून... राज कुंद्रानं मुलाला शिकवला आयुष्याचा धडा; पाहा VIDEO

इंदूर (Indore) इथल्या एम वाय हॉस्पिटलमध्ये (MY Hospital) या महिलेची शस्त्रक्रिया झाली. रुग्णालयात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेत इतकी मोठी गाठ काढण्यात आली असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.   लॅप्रोटॉमी करून या महिलेच्या अंडाशयातील भली मोठी गाठ काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया (Surgery) आव्हानात्मक होती. कारण या महिलेला मधुमेह आहे, तसंच गाठ एकदम बाहेर काढली असती तर ब्लडप्रेशर(Blood Pressure) कमी होऊन ती एकदम कोमात जाण्याचीही भीती होती, त्यामुळं ही शस्त्रक्रिया अतिशय अवघड होती, असंही डॉक्टरांनी सांगितलं. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळं या महिलेची सर्व त्रासातून सुटका झाली असून तिची तब्बेत उत्तम असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

हे वाचा -  OMG! 5 वर्षांच्या चिमुरड्यानं चालवली Landcruiser; VIDEO पाहून थक्क व्हाल

ही अवघड शस्त्रक्रिया डॉ. सुमित्रा यादव यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशातीलडॉ. विभा मोसेज, डॉ. सुरभी पोरवाल, डॉ. सपना चौरासिया, डॉ. श्रद्धा पालीवाल, डॉ. दीपमाला चौहान, डॉ. प्रशस्ती मेहता आदी महिला डॉक्टरांच्या टीमनं ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. या महिला डॉक्टरांच्या या यशाबद्दल त्यांचं कौतुक होत आहे.

First published: January 28, 2021, 8:22 PM IST

ताज्या बातम्या