Home /News /lifestyle /

बापरे! अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीच्या नाकातून काढला ब्रेन ट्युमर; आव्हानात्मक सर्जरी झालेली सर्वात लहान रुग्ण

बापरे! अवघ्या दीड वर्षांच्या चिमुरडीच्या नाकातून काढला ब्रेन ट्युमर; आव्हानात्मक सर्जरी झालेली सर्वात लहान रुग्ण

न्यूरोएन्डोस्कोपी झालेला जगातील सर्वात कमी वयाचा हा रुग्ण भारतात आहे.

    नवी दिल्ली, 22 जानेवारी : ऑपेशन (operation) किंवा सर्जरी (surgery) म्हटलं तरी कित्येकांना भीती वाटतं. मात्र अवघ्या 16 महिन्यांचा म्हणजे जवळपास दीड वर्ष होतील असा हा चिमुरडा जीव आव्हानात्मक अशा ऑपरेशनला (challenging operation) सामोरा गेला आहे. उत्तराखंडमधील (uttarakhand) 16 महिन्यांच्या चिमुरडीच्या नाकातून (nose) ब्रेन ट्यमुर (brain tumor) काढण्यात आला आहे आणि असं ऑपरेशन झालेली ती जगातील सर्वात लहान रुग्ण ठरली आहे. उत्तराखंडमधील अवघ्या 16 महिन्यांची अमायरा. 20 दिवसांपासून तिच्यामध्ये काहीतरी समस्या असल्याचं तिच्या आईला जाणवलं. अमायरा आईला कोणतीच प्रतिक्रिया देत नव्हती. तिला डोळ्यांनी नीट दिसतही नव्हतं. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या काही तपासण्याही करण्यात आल्या. रुग्णालयात तिचा एमआरआय काढण्यात आला. ज्यामध्ये तिच्या मेंदूत तब्बल 3 सेमीचा ट्युमर होतो. अमायराच्या वयाच्या मानानं या ट्युमर खूप मोठा होता.  सामान्यपणे असे ट्युमर ओपन सर्जरी करून काढले जातात आणि इतर भागाला रेडिएशन थेरेपी दिली जाते.  पण आता नाकावाटेदेखील असे ट्युमर काढता येतात. पण असं ऑपरेशन सहा वर्षांपेक्षा मोठ्या वयाच्या व्यक्तींमध्येच होतात. याआधी अमेरिकेच्या स्टेनफोर्डमध्ये एका दोन वर्षांच्या मुलावर हे ऑपरेशन करण्यात आलं आणि आता भारतातील अमायवरावर दीड वर्षे पूर्ण होण्याआधीच हे ऑपरेशन झालं आहे. न्यूरोएन्डोस्कोपी झालेली ही जगातील सर्वात छोटी मुलगी बनवली आहे. जिच्या नाकातून ट्युमर काढण्यात आला आहे. हे वाचा - धक्कादायक! सॅनिटायजरचा वापर करत असाल तर सावधान! लहान मुलांना येऊ शकतं अंधत्व PGIMER  चंदीगडमध्ये अमायराची सर्जरी करण्यात आली.  ब्रेन ट्यमुरचं ऑपरेशन केलं आहे डॉक्टरांंनी सांगतिलं लहान मुलांच्या नाकाचा आकार लहान असतो, नाकपुड्या लहान असतात, नाकातील हाड विकसित नसतं, रक्तवाहिन्या असतात. त्यामुळे इतक्या लहान नाकातून ट्युमर काढणं खूपच आव्हानात्मक असतं. यासाठी खूपच छोट्या उपकरणांचा वापर करण्यात आला. आज तकच्या रिपोर्टनुसार या चिमुरडीचं ऑपरेशन करणारे न्यूरो सर्जरी विभागातील डॉ. सुशांत यांनी सांगितलं की, या रुग्णाच्या ट्युमरपर्यंत पोहोचणं खरंतर अशक्य होतं. कारण तिचं नाक आणि नाकातील हाड विकसित नव्हतं. ब्रेन ट्यमुर काढताना नाकातून मेंदूतील स्राव येण्याचाही धोका होता. हे वाचा - पत्नी की वडील? मृत व्यक्तीच्या स्पर्मवर कोणाचा हक्क; उच्च न्यायालयाचा निर्णय पण असं आव्हानात्मक ऑपरेशन डॉक्टरांनी स्वीकालं आणि ते यशस्वीरित्या पारही पाडलं. तब्बल 6 तास ऑपरेशन झालं. सर्जरीनंतर 10 दिवसांतच अमायरा बरी झाली. तिला आता नीट दिसूही लागलं आहे.  शिवाय तिच्या सीटी स्कॅन रिपोर्टमध्येही सर्व नॉर्मल आलं आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Brain, Health, Surgery

    पुढील बातम्या