Home /News /lifestyle /

बापरे! ॲनाकोंडा... साखर कारखान्याजवळ दिसला भलामोठा अजगर VIDEO VIRAL

बापरे! ॲनाकोंडा... साखर कारखान्याजवळ दिसला भलामोठा अजगर VIDEO VIRAL

15 फूट लांब आणि 80 किलो वजनाचा हा अजगर (python) दिसताच खळबळ उडाली.

    मनोज कुमार शर्मा/लखनऊ, 22 डिसेंबर : आपल्यापैकी बहुतेक जणांनी अॅनाकोंडा ही फिल्म पाहिलीच आहे. स्क्रिनवर असा अजगर (python) पाहूनही आपल्या अंगावर काटा येतो, आपला थरकाप उडतो. मग विचार करा असा अजगर प्रत्यक्षात तुमच्या समोर आला तर... साधा छोटा साप पाहूनही आपली बोबडी वळते, मग असा अजगर पाहिला तर काय होईल? असाच अजगर सापडला आहे तो एका साखर कारखान्याजवळ. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशातील (uttar pradesh) साखर कारखान्याजवळ विशाल अजगर दिसल्यानं खळबळ उडाली आहे. सहकारिता साखर कारखान्याजवळ हा अजगर सापडला. लखीमपूर खीरीमध्ये हा साखर कारखाना आहे. मंगळवारी सकाळी  साखर कारखान्यातील काम सुरू झालं. कामगार कारखान्यात काम करत होते. तेव्हा त्यांना एक मोठा अजगर दिसला. कामगारांनी कारखान्याच्या प्रशासनाला याची माहिती दिली. यानंतर साखर कारखान्यानं याबाबत वनविभागाला कळवलं. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि अजगराला पकडलं. या अजगराला पकडण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. जवळपास एक तासांनंतर अजगर तावडीत सापडला. जवळजवळ 15 फूट लांबीचा हा अजगर. ज्याचं वजन तब्बल 80 किलो होतं. अजगर सापडताच वनविभागानं त्याला जंगलात सोडून दिलं आहे. दरम्यान या परिसरात अजगर दिसण्याची ही पहिलीच घटना नाही. याआधीदेखील कित्येक वेळा इथं अजगर दिसून आले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. हे वाचा - OMG! बाथरूमचा दरवाजा उघडला आणि छत तोडून अचानक आला भलामोठा अजगर; पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO हा अजगर तरी कारखान्याच्या परिसरातच आढळला आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच टॉयलेटमध्ये अजगर दिसून आला होता. बाथरूमचं छत तोडून अजगर आला होता. थायलंडच्या फिटशनूलोक शहरातील एका रेस्टॉरटमधील ही घटना. जवळपास 8 फूट लांबीचा हा अजगर  छताला लटकत होता. रेस्टॉरंडमधील ज्या कर्मचाऱ्यानं त्याला पाहिलं त्यानं त्याचा व्हिडीओ बनवून सोशल मीडियावरही शेअर केला. काही वेळ हा अजगर असाच लटकत होता. त्याला आपली शिकार काही सापडली नाही. मग तो पुन्हा त्या छताच्या आत गेला. हे वाचा - मेंढ्या-बकऱ्यांचा शहरात धुमाकूळ, नागरिकांना केलेल्या मारहाणीचा VIDEO VIRAL यानंतरपोलीस आणि रेस्क्यू टिमला याची माहिती दिली. अजगराचा शोध घेण्यात आला मात्र तो काही सापडला नाही. मात्र तिथून काही अंतरावर दूर एका अजगराला पकडण्यात आला. रेस्टॉरंटमध्ये जो अजगर होता कदाचित तोच हा अजगर असावा असं मानलं जातं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Python, Social media viral, Viral, Viral videos, Wild animal

    पुढील बातम्या