कोलकाता, 27 नोव्हेंबर : तशी तोंडाने शिट्टी वाजवली जाते. म्हणजे. ओठांचा विशिष्ट पद्धतीने आकार करून तोंडातून हवा बाहेर सोडून ही शिट्टी वाजते. पण पश्चिम बंगालमधील (West Bengal) एका 12 वर्षांच्या मुलाच्या बाबतीत मात्र विचित्रच घडत होतं. हा मुलगा तोंड उघडण्याचा प्रयत्न करताच शिट्टी वाजायची. बरं तो मुद्दामहून शिट्टी वाजवायचं असं नाही. तर ती आपोआपच वाजायची (Boy swallowed plastic whistle). यानंतर या मुलाला रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा त्याचा मेडिकल रिपोर्ट पाहून डॉक्टरांनाही धक्का बसला.
दक्षिण 24 परगना (South 24 Pargana) जिल्ह्यातील बरुईपुर (Baruipur) राहणारा रेहान लस्कर. ज्याच्या तोंडातून शिट्टी वाजत होती. सुरुवातीला त्याच्या पालकांना त्याची समस्या समजली नाही. पण काही कालवधीने रेहान आता एक मिनिटही पाण्याच्या आत राहू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. हळूहळू त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या, त्याला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला. त्यानंतर पालक घाबरले.
त्यांनी रेहानला नेमकं काय झालं होतं, ते विचारलं. तेव्हा रेहानने आपल्या पालकांसमोर जो खुलासा केला. ते ऐकून पालक हडबडलेच. त्यांनी रेहानला घेऊन तात्काळ रुग्णालयाकडे धाव घेतली. हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं. तिथून त्याला एसएसकेएम रुग्णालयात पाठवण्यात आलं.
हे वाचा - अरे बापरे! हे काय? एक घोट घेताच पार्श्वभागाखाली झाला ब्लास्ट; VIDEO VIRAL
रुग्णालयातील इन्स्टिट्युट ऑफ ऑफ ओटोरहिनोलारिंजोलॉजी अँड हेड अँड नेक सर्जरीच्या डॉक्टरांनी सांगितलं, त्याचा एक्स-रे आणि सीटी स्कॅन रिपोर्ट पाहिलाय तेव्हा त्याच्या फुफ्फुसात एक शिट्टी दिसली. जानेवारीत त्याने चुकून शिट्टी गिळली होती. चिप्स खाताना शिट्टी त्याच्या तोंडात गेली आणि ती फुफ्फुसात अडकली. यानंतर जेव्हा जेव्हा तो तोंड उघडायचा तेव्हा त्याच्या तोंडातून शिट्टीचा आवाज ऐकू यायचा.
रेहानच्या वडिलांनी सांगितलं की त्याने शिट्टी गिळली तेव्हा घरात कुणालाच काही सांगितलं नाही. पण जेव्हा छातीत वेदना सुरू झाल्या तेव्हा त्याने याबाबत सांगितलं.
हे वाचा - वेटरच्या सतर्कतेमुळे वाचला चिमुकल्याचा जीव; काळजाचा ठोका चुकवणारा VIDEO
डॉक्टरांनी सर्जरी करून त्याच्या फुफ्फुसातून शिट्टी बाहेर काढली आहे. डॉक्टरांनी सांगितलं, त्यानंतर त्याच्यावर सर्जरी करण्यात आली. आम्ही ब्रोन्कोस्कोपी आणि एका ऑप्टिकल फोर्सेपचा वापर करून शिट्टी त्याच्या शरीरातून बाहेर काढली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार तब्बल अकरा महिने ही शिट्टी या मुलाच्या फुफ्फुसात होती. तरी सुदैवाने त्याला काहीच झालं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Kolkata, Lifestyle, Parents and child, Surgery, West bengal