Home /News /lifestyle /

वयाच्या 11-12 व्या वर्षीच SEX; इथं कमी वयात लैंगिक संबंधासाठी कायदेशीर परवानगी

वयाच्या 11-12 व्या वर्षीच SEX; इथं कमी वयात लैंगिक संबंधासाठी कायदेशीर परवानगी

इथं 13-14 वर्षाच्या मुली आई बनण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे.

मनिला, 22 डिसेंबर : जगभरात परस्पर सहमतीनं लैंगिक संबंध (Sex) ठेवण्यासाठी कायदेशीर परवानगी असण्याचं वय वेगवेगळं आहे. भारतात हे वय 18 वर्षे आहे, तर जर्मनी आणि  इटलीत हे वय 14 वर्षे आहे, मात्र संबंध ठेवणाऱ्यांच्या वयातील अंतर खूप नसले पाहिजे अशी अट आहे. अन्यथा तो बलात्काराचा (Rape) गुन्हा ठरू शकतो. मात्र फिलीपाईन्स (Philippines) हा असा देश आहे जिथं वयाच्या 12 व्या वर्षी लैंगिक संबंध ठेवण्यास परवानगी आहे. नायजेरीया (Nigeria) तर याच्या पुढं एक पाऊल आहे. तिथं परस्पर संमतीनं लैंगिक संबंध ठेवण्याचं वय 11 वर्षे आहे. हे दोन्ही देश अत्यंत गरीब आहेत. फिलीपाईन्समध्ये 13-14 वर्षाच्या मुली आई बनण्याचं प्रमाण सर्वाधिक असून 2017 मध्ये तिथल्या अधिकृत संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार दररोज 538 अल्पवयीन मुली बाळांना जन्म देतात. कोवळ्या वयातील मुलींच्या मृत्यूचं प्रमाणही अधिक आहे. 1987 मध्ये अवघ्या अकरा वर्षांची एक मुलगी लैंगिक संबंधांदरम्यान झालेल्या जखमांमुळे मृत्युमुखी पडल्यानंतर हा अल्प वयाचा मुद्दा चर्चेत आला, पण घडलं काहीही नाही. रस्त्यावर उभं राहून वेश्या व्यवसाय करणाऱ्या या मुलीनं आपलं वय 12 सांगितल्याचा बनाव तिच्याशी लैंगिक संबंध ठेवणाऱ्या ऑस्ट्रियन डॉक्टरनं केला. मानवाधिकार संस्थांनी याबाबत आवाज उठवल्यावर या डॉक्टरला देशातून हाकलून देण्यात आलं; त्याला कोणतीही शिक्षा झाली नाही आणि त्यावेळी वयोमर्यादा बदलण्याबाबत कोणता निर्णयही झाला नाही. अन्य देशांमध्ये इतक्या लहान वयाच्या मुलीबरोबर लैंगिक संबंध ठेवणं बेकायदेशीर असल्यानं हा बलात्काराचा गुन्हा ठरला असता आणि त्या डॉक्टरला शिक्षा झाली असती, पण फिलीपाईन्समध्ये असं काहीही घडलं नाही. त्यानंतर आजतागायत तिथं हजारो कोवळ्या वयातील मुली विकृत मनोवृत्तीच्या पुरुषांच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडल्या आहेत. लैंगिक संबधादरम्यान होणाऱ्या जखमा आणि लहान वयातील गर्भारपण ही या लहान मुलींच्या मृत्यूची मुख्य कारणं आहेत. हे वाचा - कोरोनाशी लढण्यात महिला पुरुषांपेक्षा सरस,रोगप्रतिकारवर्धक हॉर्मोन्सचा होतो फायदा फिलीपाईन्समध्ये पर्यटन व्यवसाय (Tourism) हाच उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळं तिथं पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी या वयाच्या मर्यादेकडं (Age Limit) सरकारही दुर्लक्ष करतं. फिलीपाईन्समध्ये  आता अनेक वर्षांनी इथल्या मुलींच्या आयुष्यात सोनेरी पहाट उगवण्याची शक्यता निर्माण झाली आहे कारण बाल गुन्हेगारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या देशात आता लैंगिक संबंध ठेवण्याची वयोमर्यादा आता 12 वरून 16 वर्षे करण्याचा विचार सुरू आहे. यासंदर्भातील नवा कायदा येणार आहे. हे वाचा - धक्कादायक! Butt lift surgery बेतली जीवावर; शस्त्रक्रियेनंतर मॉडेलचा मृत्यू मुलांच्या अधिकारासाठी काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांनी हा मुद्दा लावून धरल्यावर कायद्यात सुधारणा करण्यास फ़िलीपाईन्स सरकार तयार झालं आहे. आता 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीशी किंवा मुलाशी लैंगिक संबंध ठेवल्यास तो बलात्काराचा गुन्हा ठरवला जाईल आणि दोषी व्यक्तीला 40 वर्षांची शिक्षा होईल. संमतीनं लैंगिक संबंध ठेवल्याचा युक्तिवाद कोणीही करू शकणार नाही. तसंच यात आणखी एक तरतूद करण्यात आली असून, त्याला स्वीटहार्ट क्लॉज असं नाव देण्यात आलं आहे. यानुसार लैंगिक संबंध ठेवणाऱ्यांची वये समान असतील किंवा दोघांत फार अंतर नसेल तर त्या परिस्थितीत दोघांनाही शिक्षा होणार नाही. त्या मुलांना बालसुधारगृहात पाठवलं जाईल.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Sexual harrasment, Sexual health, Sexual relationship, World news

पुढील बातम्या