मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

चालताना चालण्याच्या वेगात बदल करून दुप्पट वजन कमी करा; जाणून घ्या ही पूर्ण पद्धत

चालताना चालण्याच्या वेगात बदल करून दुप्पट वजन कमी करा; जाणून घ्या ही पूर्ण पद्धत

धावपळीच्या जीवनशैलीमुळं आजकाल 30 वर्षांनंतर लोक वजन वाढणे आणि लठ्ठपणाच्या समस्यांनी त्रस्त होऊ लागले आहेत. थोडे पुढे गेल्यावरच त्याचे परिणाम उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्ये बदलू लागतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 ऑक्टोबर : व्यग्र जीवनशैलीमध्ये आपल्या फिटनेसची काळजी घेणं सोपं नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बैठ्या कामांमुळं वजन वाढू लागतं. दिवसभरातील कामांनंतर आरोग्य आणि फिटनेससाठी वेळ काढणे अनेकांना शक्य होत (Walking Schedule For Health) नाही. धावपळीच्या जीवनशैलीमुळं आजकाल 30 वर्षांनंतर लोक वजन वाढणे आणि लठ्ठपणाच्या समस्यांनी त्रस्त होऊ लागले आहेत. थोडे पुढे गेल्यावरच त्याचे परिणाम उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्ये बदलू लागतात.

अशा परिस्थितीत आपलं आरोग्य जपणं काळजी गरज आहे आणि वजन वाढू न देण्याकडे कटाक्षाने लक्ष देणे आवश्यक झाले आहे. याबाबत दैनिक भास्कर वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, जर तुम्ही चालताना (Walking) चालण्याच्या वेगात बदल करून चालत असाल तर त्यामुळं वजन अधिक वेगानं कमी करता येऊ शकतं.

हे वाचा - बलात्कार करण्याआधी महिलांना हे 3 पर्याय द्यायचा आरोपी, मग करायचा घृणास्पद कृत्य, अखेर अटक

या अहवालात दावा केला आहे की, जर तुम्ही दिवसातून 33 मिनिटे चालत असाल तर त्यातून 500 कॅलरीजहून अधिक बर्न करू शकता, परिणामी तुम्ही एका महिन्यात 1 किलोपर्यंत वजन कमी करू शकता.

एका महिन्यात 1 किलो वजन कसे होईल कमी

जर तुम्हाला चालून वजन कमी करायचे असेल, तर चालताना वेग बदलून चालावे. यामुळे वजन जलद कमी होते, चालण्याचा वेग प्रत्येक व्यक्तीचा वेगळा असतो, पण जास्तीत-जास्त वेगाने चालण्याचा प्रयत्न करावा. जर तुम्ही दररोज 33 मिनिटांचे चालण्याचे वेळापत्रक केले तर तुम्ही 500 कॅलरीजहून अधिक बर्न करू शकता आणि एका महिन्यात सुमारे 1 किलो वजन कमी करू शकता, अशी माहिती एज्युकेशन फॉर फिटनेस स्टूडियोचे निर्देशक (कॅलिफोर्निया) इरविन यांनी म्हटले आहे.

हे वाचा - SBI Alert! कोट्यवधी ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना, उद्यापासून 3 दिवस या वेळेत करता येणार नाहीत महत्त्वाचे बँक व्यवहार

33 मिनिटांचे चालण्याचे वेळापत्रक असे बनवा

– 10 मिनिटे नॉर्मल स्टेप्सद्वारे चालत वॉर्मअप करा.

– 2 मिनिटे 6-8 kmph च्या स्पीडने चालत रहा.

– 4 मिनिटे श्वास जास्त न वाढता चालत रहा.

– 3 मिनिटे नंतर फास्ट चालत रहा.

– 3 मिनिटे फक्त एवढ्याच स्पीडने चाला कि तुम्हाला बोलता येऊ शकेल

– 4 मिनिटे पुन्हा फास्ट चालत रहा.

– 2 मिनिटे चालत राहून पुन्हा अशा स्पीडने चाला कि तुम्हाला बोलता येऊ शकेल

– शेवटी 5 मिनिटे असंच नॉर्मल चालत पुन्हा नॉर्मल स्थितीमध्ये या

First published:

Tags: Weight loss, Weight loss tips