Home /News /lifestyle /

धक्कादायक! फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज नाही तर देशातील तब्बल 1.48 कोटी मुलं घेतात ड्रग्ज

धक्कादायक! फक्त बॉलिवूड सेलिब्रिटीज नाही तर देशातील तब्बल 1.48 कोटी मुलं घेतात ड्रग्ज

सध्या एनसीबीच्या चौकशीत बॉलिवूडमधील सेलिब्रिटींचा पर्दाफाश होतो आहे. मात्र सर्वसामान्य मुलं आणि प्रौढ व्यक्तीही मोठ्या प्रमाणात ड्रग्जच्या (drugs) आहारी गेले आहेत, हे राष्ट्रीय सर्वेक्षणातून समोर आलं आहे.

    नवी दिल्ली, 27 सप्टेंबर : सध्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) निशाण्यावर बडे बॉलिवूड सेलिब्रिटी (bollywood celebrity) आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा ड्रग्ज (drugs) अँगलने तपास करताना बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आणि त्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कित्येक बॉलिवूड सेलिब्रिटींभोवती चौकशीचा फास आवळला. मात्र फक्त बॉलिवूडच नाही तर देशातील सर्वसामान्य मुलंही ड्रग्ज घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतातील जवळपास 1.48 मुलं ड्रग्जं घेतात अशी धक्कादायक माहिती केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात समोर आली आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे ही मुलं फक्त 10 ते 17 वयोगटातील आहेत. सामाजिक न्याय मंत्रालयाने 2018 साली 10 ते 75 वयोगटातील लोकांचं सर्वेक्षण केलं होतं. सामाजिक न्यायमंत्री रतनलाल कटारिया यांनी 20 सप्टेंबरला लोकसभेत याबाबत माहिती दिली. सर्वेक्षणानुसार, 10 ते 17 वयोगटाील अंदाजे 40 लाख मुलं अफिम, 20 लाख मुलं भांग, दोन लाख मुलं कोकिन आणि 4 लाख मुलं उत्तेजित करणाऱ्या पदार्थांचं सेवन करतात. तर 18 ते 75  वयोगटातील 2.90 कोटी लोक भांग,  1.90 अफिम, 10 लाख कोकिन तर 20 लाख लोक उत्तेजना देणाऱ्या पदार्थांचं सेवन करतात. हे वाचा - 'माल है क्या' बाबत NCB ने केलेल्या सवालांमुळे दीपिकाला कोसळलं रडू- सूत्र फोर्टिस रुग्णालयातील मानसिक आरोग्य तज्ज्ञ डॉ. समीर पारिख यांनी सांगितलं, लहान मुलांमधील अंमली पदार्थांचं सेवन वाढत आहे. कुटुंबामध्ये एखाद्या व्यक्तीला कोणतं ना कोणतं व्यसन, एखाद्या घटनेमुळे मानसिक ताण वाढणं, धकाधकीच्या जीवनशैलीत पालक व्यस्त आहेत त्यामुळे ते आपल्या मुलांना वेळ देऊ शकत नाही. या सर्व कारणांमुळे मुलांमधील अमली पदार्थांकडे वळतात. हे वाचा - दीपिका, साराच्या मोबाइलमधुन सत्य होईल उघड; या सुपरस्टार अभिनेत्रींना NCB चा दणका वेब एमडीवरील माहितीनुसार, डोळे लाल दिसणं, नाकातून रक्त येणं, आक्रमक होणं, चिडचिड करणं, शरीर थरथरणं, नीट बोलता न येणं अशी लक्षणं तुमच्या मुलांमध्येही दिसत असतील तर त्यांना ड्रग्जचं व्यसन लागलेलं असू शकतं. तसंच त्यांच्या दिनक्रमात बदल, वैयक्तिक स्वच्छता न राखणं, वारंवार पैशांची मागणी करणं, नवे मित्र आणि कधीही न केलेल्या गोष्टी करणं अशा त्यांच्या सवयींमध्ये बदल झाले तर वेळीच सावध व्हा.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: India, Parents and child

    पुढील बातम्या