कोल्हापूरच्या उद्योजक कुटुंबावर शोककळा; रिव्हॉल्वहर साफ करत होता मुलगा, चुकून गोळी झाडली आणि...

कोल्हापूरच्या उद्योजक कुटुंबावर शोककळा; रिव्हॉल्वहर साफ करत होता मुलगा, चुकून गोळी झाडली आणि...

बंदुकीची स्वच्छता करताना सागर याच्या हातून चुकून गोळी झाडली गेली आणि त्यालाच लागली. यामुळं गोळी लागल्यानं सागर गाट याचा मृत्यू झाला.

  • Share this:

कोल्हापूर, 24 एप्रिल : कोल्हापूरमध्ये एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली आहे. रिव्हॉल्व्हर साफ करत असताना गोळी झाडली जाऊन, उद्योजकाच्या मुलगा ठार झाला आहे. हा मुलगा स्वतःच रिव्हॉलव्हर साफ करत होता, त्यावेळी गोळी झाडली जाऊन तो ठार झाला. त्यामुळं या कुटुंबाबरोबर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

(वाचा-दारूची तहान सॅनिटायझरनं भागवली; यवतमाळमध्ये 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू)

कोल्हापूरच्या हुपरीमधील शांतीनगर याठिकाणी ही घटना घडली आहे. सुनिल गाट हे हुपरी इथले चांदीचे उद्योजक आहेत. त्यांच्याकडे असलेली त्यांची रिव्हॉल्व्हर त्यांचा 27 वर्षीय मुलगा सागर गाट हा साफ करत होता. त्याचवेळी बंदुकीची स्वच्छता करताना सागर याच्या हातून चुकून गोळी झाडली गेली आणि त्यालाच लागली. यामुळं गोळी लागल्यानं सागर गाट याचा मृत्यू झाला.

(वाचा - अकोल्यात रेमडेसिवीरचा काळा बाजार, गुन्हे शाखेनं सापळा रचून आरोपींना केली अटक)

सुनील गाट हे कोल्हापूरमधले चांदीचे उद्योजक आहे. व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना अनेकदा बाहेर राज्यांमध्येही जावं लागतं. गाट यांचा चांदीचा व्यवसाय असल्याने त्यांच्याकडे अनेकदा चांदी किंवा रक्कम असते, त्यामुळं स्वतःच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी रिव्हॉल्व्हर घेतलेली होती. वडिलांची हीच रिव्हॉल्व्हर साफ करणं सागरला महागात पडलं असून या दुर्दैवी अपघातामध्ये गाट कुटुंबाला त्यांचा तरुण मुलगा गमवावा लागला आहे.

या घटनेमुळं संपूर्ण गाट कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसंच अचानक अशा दुर्दैवी घटनेमध्ये तरुणाचा मृत्यू झाल्यानं शांतीनगर परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे.

Published by: News18 Desk
First published: April 24, 2021, 8:19 PM IST

ताज्या बातम्या