Home /News /kolhapur /

मॅच पाहतानाच मृत्यूनं गाठलं; कोल्हापुरातील तरुणाचा मैदानातच दुर्दैवी अंत

मॅच पाहतानाच मृत्यूनं गाठलं; कोल्हापुरातील तरुणाचा मैदानातच दुर्दैवी अंत

(फोटो-लोकमत)

(फोटो-लोकमत)

कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाचा क्रिकेटचा सामना (Cricket Match) पाहत असताना, मैदानातच मृत्यू (Died while watching cricket match) झाला आहे.

    कोल्हापूर, 28 नोव्हेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या करवीर तालुक्यात एक हृदय हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. येथील एका तरुणाचा क्रिकेटचा सामना (Cricket Match) पाहत असताना, मैदानातच मृत्यू (Died while watching cricket match) झाला आहे. संबंधित तरुण क्रिकेट पाहत असताना, त्याला अचानक हृदयविकाराचा झटका (Died by heart attack) आला आहे. आसपासच्या तरुणांनी त्याला त्वरीत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. क्रिकेट पाहत असताना तरुणाचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने क्रिकेट प्रेमींना धक्का बसला असून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. रविराज कांबळे असं मृत पावलेल्या 34 वर्षीय तरुणाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या करवीर तालुक्यातील वरणगे पाडळी याठिकाणी क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. मृत रविराज कांबळे हा देखील याठिकाणी सामने खेळण्यासाठी गेला होता. दरम्यान मृच रविराज हा आपल्या काही मित्रांसोबत दुसऱ्या संघाची मॅच पाहत बसला होता. यावेळी मॅच पाहत असताना रविराजला अचानक चक्कर आली आणि तो खाली कोसळला. हेही वाचा-पुतण्या पेटवून घेत होता अन् चुलता पाहतच राहिला; धक्कादायक घटनेनं जालना हादरलं! यानंतर रविराजच्या मित्रांनी त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण उपचार करण्यापूर्वीच वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. रविराजचा अशाप्रकारे दुर्दैवी मृत्यू झाल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा- 'गड आला पण सिंह गेला', सामनावीर ठरलेल्या क्रिकेटपटूला मैदानातच मृत्यूने गाठलं या घटनेची माहिती करवीर पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. 34 वर्षीय मृत रविराज हा विवाहित होता. त्याच्या पश्चात पत्नी, दीड वर्षांची मुलगी, आई वडील आणि भाऊ असा परिवार आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur

    पुढील बातम्या