Kolhapur: महिलेची हिरण्यकेशी नदीत उडी घेत आत्महत्या; एका गाठोड्यामुळे झाला घटनेचा उलगडा

Kolhapur: महिलेची हिरण्यकेशी नदीत उडी घेत आत्महत्या; एका गाठोड्यामुळे झाला घटनेचा उलगडा

Suicide in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हिरण्यकेशी नदीत उडी (Suicide in Hiranyakeshi River) घेत एक महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

  • Share this:

गडहिंग्लज, 29 ऑगस्ट: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील गडहिंग्लज-चंदगड राज्य मार्गावरील हिरण्यकेशी नदीत (Suicide in Hiranyakeshi River) उडी घेत एक महिलेनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एका अज्ञात महिलेनं भडगाव पुलानजीक हिरण्यकेशी नदीत उडी घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी एका सुसाईड नोटसह (Found suicide note) महिलेचं काही साहित्य देखील आढळलं आहे. या सुसाईड नोटमधून महिलेनं आत्महत्येच्या कारणाचा आणि त्याला जबाबदार असणाऱ्या लोकांचा उल्लेख केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे.

संबंधित आत्महत्या करणारी महिला नेमकी कोण होती, याची अद्याप ओळख पटली नाही. घटनास्थळावरील काही नागरिक आणि पोलिसांनी दिलेल्या  माहितीनुसार, शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एक महिला पोत्यात बांधलेलं गाठोडं डोक्यावर घेऊन पायी चालत भडगाव पुलानजीक हिरण्यकेशी नदीजवळ आली. यानंतर पुलाच्या पश्चिम बाजूनं नदीत उतरली.

हेही वाचा-औरंगाबादेत महिलेला विवस्त्र करून मारहाण; रस्त्यावरील लोकांनी दिले अंगावरचे कपडे

याठिकाणी गेल्यानंतर तिने डोक्यावरील गाठोडं जमिनीवर खाली ठेवलं. तसेच त्या गाठोड्याला सेफ्टी पिनानं सुसाइड नोट लावली. तसेच चिठ्ठी उडून जावू नये, म्हणून त्यावर दगडही ठेवला. त्यानंतर गाठोड्यावर निळ्या रंगाची ओढणी टाकली, तसेच तिथेच पायातील चप्पलही काढून ठेवली. त्यानंतर अनवाणी पायानं नदीपात्रात जाऊन उडी घेत आत्महत्या केली आहे. ही घटना समोर आल्यानंतर भडगाव पुलावर अनेकांनी गर्दी केली होती.

हेही वाचा-रक्षाबंधनासाठी बायकोला माहेरी घेऊन गेला अन् परतलाच नाही; जुन्या BF ने काढला काटा

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी आढळलेलं गाठोडं, चिठ्ठी, चप्पल आणि ओढणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. संबंधित चिठ्ठीत महिलेनं आत्महत्येच्या कारणाचा उल्लेख केला आहे. तसेच आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या लोकांची नावंही लिहिली आहेत. यामध्ये गावातील पाच महिलांसह दोन पुरूषांचा समावेश आहे. आत्महत्येच्या नेमक्या कारणाचा खुलासा अद्याप पोलिसांकडून करण्यात आला नाही. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Published by: News18 Desk
First published: August 29, 2021, 8:17 AM IST

ताज्या बातम्या