Home /News /kolhapur /

तुम्ही शाळेत उशिरा का येता? पत्रकाराने विचारले अन् शिक्षिकेने हेल्मेटनेच सुरू केली मारहाण, LIVE VIDEO

तुम्ही शाळेत उशिरा का येता? पत्रकाराने विचारले अन् शिक्षिकेने हेल्मेटनेच सुरू केली मारहाण, LIVE VIDEO

 'आम्ही काहीही करू, तुम्हाला काय करायचे. आमच्याविरोधात बातम्या लावू नका, आमची संघटना खूप मोठी आहे. परत जर...'

'आम्ही काहीही करू, तुम्हाला काय करायचे. आमच्याविरोधात बातम्या लावू नका, आमची संघटना खूप मोठी आहे. परत जर...'

'आम्ही काहीही करू, तुम्हाला काय करायचे. आमच्याविरोधात बातम्या लावू नका, आमची संघटना खूप मोठी आहे. परत जर...'

    कोल्हापूर, 10 एप्रिल : जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेला पत्रकारांनी शाळेत उशिरा का येत असल्याचा प्रश्न विचारला म्हणून बाईने (techer beating journalist)  पत्रकारालाच हेल्मेटने (helmet ) मारहाण केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. या शिक्षिकेचा हा प्रताप मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडसाळी गावात ही घटना घडली. कविता मोरे असं या शिक्षिकेचं नाव आहे. कविता मोरे या जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षिका आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्या शाळेवर उशिरा येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. याचीच दखल घेऊन पन्हाळा परिसरातील स्थानिक दैनिकाचे पत्रकार रामचंद्र बाबु कर्ले हे आपल्या कॅमेऱ्यामॅनसह रिपोर्टिंग करण्यासाठी शाळेत पोहोचले होते. कविता मोरे या शाळेत दाखल होताच रामचंद्र कर्ले यांनी शाळेत उशिरा आलेल्या शिक्षिका कविता मोरे यांची प्रतिक्रिया घ्यायला गेले. पण, स्कुटीवर उतरताच कविता मोरे यांनी डोक्यात हेल्मेट काढले आणि रामचंद्र कर्ले यांना मारहाण सुरू केली. आपल्यासोबत अचानक घडलेल्या या प्रकारामुळे कर्ले अवाक् झाले. (फेस क्लीन अप आहे सगळ्या स्कीन प्रॉब्लेम्सचं मूळ; सुंदर, ग्लोईंग फेससाठी या टिप्स) एवढंच नाहीतर 'आम्ही काहीही करू, तुम्हाला काय करायचे. आमच्याविरोधात बातम्या लावू नका, आमची संघटना खूप मोठी आहे. परत जर आमच्या शाळेबद्दल बातम्या छापल्या तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, आमचा नाद करायचा नाही' अशी धमकीच कविता मोरे यांनी कर्ले यांना दिली. या प्रकारानंतर रामचंद्र कर्ले यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि कविता मोरे यांच्याविरोधात तक्रार दिली. कर्ले यांच्या तक्रारीवरून कविता मोरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या