Weather Update : कोल्हापूरकरांनो, सावध राहा, 2 दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

Weather Update : कोल्हापूरकरांनो, सावध राहा, 2 दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

21 आणि 22 जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 20 जुलै : मुंबई, ठाण्यासह राज्यभरात पावसाने (rain ) दमदार हजेरी लावली आहे. मुंबईत आज पावसाने उसंत घेतली असली तरी वरुणराजेंनी आपला मोर्चा आता पश्चिम महाराष्ट्रकडे वळवला आहे. कोल्हापुरात (kolhapur rain) पुढील दोन दिवसात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. डोंगरी भागात भुस्खलन होण्याची भीती सुद्धा वर्तवली आहे.

राज्यात ठिकठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कोल्हापूरमध्ये सुद्धा पावसाने धुमशान घातले आहे. पुढील दोन दिवसांत जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 21 आणि 22 जुलै रोजी जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.  70 ते 120 मि मी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

IND vs SL : भुवनेश्वर कुमारकडून 6 वर्ष, 3093 बॉलनंतर चूक, पाहून हैराण व्हाल

पाऊस वाढल्याने नद्यांची पातळीही वाढणार आहे. त्यामुळे हवामान खात्याने नदी किनारी असलेल्या गावांना सावधानतेचा इशारा दिला आहे. ज्या भागात दरडी कोसळण्याची भीती आहे, अशी परिसरात भुस्खलन होण्याची भीती सुद्धा वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, कोकणात काहीसा पावसाचा जोर कमी झाला असला, तरी बहुतांशी ठिकाणी ऑरेंज अलर्ट (Orange alert) जारी करण्यात आला आहे. हवामान खात्यानं (IMD) आज रत्नागिरीला (Ratnagiri) रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. तर राज्यातील अन्य सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. आज राज्यात मुंबई वगळता संपूर्ण कोकण किनारपट्टी आणि घाट परिसरात जोरदार पावसाची शक्यता आहे.

टेलिकॉम कंपन्यांच्या कॉल्समुळे त्रस्त आहात? हे करून बघा नेहमीसाठी बंद होतील कॉल

आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना हवामान खात्यानं ऑरेज अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी पुढील काही तासांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. तर रत्नागिरी परिसरात काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर मुंबईत आज पावसानं काहीसी उसंत दिली आहे. पण सायंकाळनंतर मुंबईत काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या सरी कोसळण्याची दाट शक्यता आहे. हवामान खात्यानं आज मुंबईला येलो अलर्ट दिला आहे.

Published by: sachin Salve
First published: July 20, 2021, 8:52 PM IST
Tags: kolhapur

ताज्या बातम्या