Home /News /kolhapur /

Kolhapur: शेवटी माणुसकी आली कामाला; अज्ञात मृताचे नातेवाईक शोधण्यासाठी पोलिसांनी केलं जीवाचं रान

Kolhapur: शेवटी माणुसकी आली कामाला; अज्ञात मृताचे नातेवाईक शोधण्यासाठी पोलिसांनी केलं जीवाचं रान

कोल्हापुरातील सीपीआर मध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर, पोलिसांनी कोणतीही माहिती हाती नसताना, त्याच्या नातेवाईकांना शोधून काढलं आहे.

    कोल्हापूर, 03 जानेवारी: कोल्हापुरातील सीपीआरमध्ये गेल्या एक महिन्यापासून एका अज्ञात व्यक्तीवर उपचार सुरू होती. संबंधित व्यक्ती कोण आणि त्याचे नातेवाईक कुठे राहतात. याची कसलही माहिती डॉक्टरांकडे अथवा पोलिसांकडे नव्हती. अशा या अज्ञात व्यक्तीचा अचानक उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची चांगलीच धावपळ झाली. कोणतीही माहिती हाती नसताना, केवळ माणुसकीच्या नात्याने शोध घेत पोलिसांनी मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधून काढलं आहे. नेमकं प्रकरण काय आहे? एका चहा विक्रेत्याने महिनाभरापूर्वी एका अज्ञात व्यक्तीला सीपीआर रुग्णालयात दाखल केलं होतं. त्याच्यासोबत कोणतेही नातेवाईक नसताना, डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले जात होते. पण अचानक उपचारादरम्यान संबंधित रुग्णाचा मृत्यू झाला. सीपीआर रुग्णालयाकडून राजारामपुरी पोलीस ठाण्यात याची माहिती देण्यात आली. महिनाभरापूर्वी चहाच्या गाड्यावर काम करणाऱ्या एका व्यक्तीने संबंधित अज्ञाताला रुग्णालयात दाखल केलं, एवढीच माहिती डॉक्टरांकडे होती. हेही वाचा-लेकांना अंत्यविधीपासून रोखलं; लेकींनीच आईला दिला खांदा, कारण वाचून पाणवतील डोळे याच माहितीच्या आधारे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार राजेंद्र कलगुटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तारळेकर यांनी मृताच्या नातेवाईकांना शोधण्यास सुरुवात केली. अज्ञात व्यक्तीला ज्या चहा विक्रेत्याने रुग्णालयात दाखल केलं होतं, त्याचा मोबाइल नंबर पोलिसांना डॉक्टरांच्या नोंदणी वहीत मिळाला. पण संबंधित नंबरवर बॅलन्स टाकला नसल्याने संपर्क होत नव्हता. त्यामुळे कलगुटकर आणि तारळेकर यांनी संबंधित चहा कामगाराच्या मोबाइल नंबरवर आधी रिचार्ज केला. त्यानंतर चहा कामगाराला संपर्क होऊ शकला. संबंधित चहा कामगार गांधीनगरातील एका चहाच्या दुकानात कामाला असल्याची माहिती मिळाली. हेही वाचा-जन्मदात्यांसोबत क्रूरतेचा कळस; मुलाने कोयत्याने आईवर केले वार, बापाची छाटली बोटं पण संबंधित मृत व्यक्ती नेमकी कोण याची काहीही माहिती मिळाली नाही. पोलिसांनी गांधीनगरात जाऊन तपास केला असता, मृत व्यक्ती राजारामपुरी भागातील असल्याची अर्धवट माहितीमिळाली. याच माहितीच्या आधारे सहायक फौजदार राजेंद्र कलगुटकर आणि पोलीस कॉन्स्टेबल अविनाश तारळेकर यांनी आठ तास अथक प्रयत्न करत नातेवाईकांचा तपास लावला आहे. यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने केलेली धावपळ पाहून अनेकांनी त्यांचं कौतुक केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kolhapur

    पुढील बातम्या