कोल्हापूर, 30 जुलै: अतिवृष्टीमुळे (Heavy rainfall) नुकसान झालेल्या पूरग्रस्त कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) दौरा करत आहेत. या दौऱ्यात कोल्हापुरातील शाहूपुरी (Shahupuri) परिसरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Uddhav Thackeray Devendra Fadnavis meeting) हे एकमेकांसमोर आले. यावेळी दोन्ही नेत्यांच्यात काही चर्चा सुद्धा झाली. यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगण्यास सुरुवात झाली. मात्र, आता या भेटीमागचं कारण समोर आलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूपूरी मधील पूरग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी जात असतान त्याच ठिकाणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस देखील पहाणी करत असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना मिळाली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना निरोप दिला की देवेंद्र फडणवीस यांना मी तीथेच भेटतो. त्यानंतर शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निरोप देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत भेट करून दिली. या भेटीत फक्तं पूरग्रस्तांच्या प्रश्नांवर चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे.
कोल्हापूर दौऱ्यात उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचा संवाद; दोघांत काय झाली चर्चा?
शाहूपुरी परिसरात नागरिकांसोबत संवाद साधत असताना राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तेथून जात होते. यावेळी दोन्ही नेते हे एकमेकांच्या समोरासमोर आले. दोन्ही नेत्यांत काहीतरी चर्चा झाल्याचं दृश्यांत दिसत आहे. गर्दी आणि आवाज इतका होता की दोन्ही नेत्यांत नेमकी काय चर्चा, बोलणं झालं याची माहिती समजू शकलेली नाहीये. मात्र, या दोन्ही नेत्यांत झालेल्या संवादावरुन चर्चांना उधाण आले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिरोळ परिसर, कोल्हापूर येथील शाहूपुरी 6वी गल्ली, गंगावेश, शिवाजी पूल परिसरातील परिस्थितीची पाहणी करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.