कोल्हापुरात व्यापारी आणि प्रशासनातला संघर्ष टळला, दुकानांबाबतचा निर्णय तुर्तास मागे

कोल्हापुरात व्यापारी आणि प्रशासनातला संघर्ष टळला, दुकानांबाबतचा निर्णय तुर्तास मागे

ग्रामीण आणि शहरी भाग असा वेगळा पॉझिटिव्हीटी रेट काढण्याची व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 28 जून: कोल्हापूरमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पुन्हा एकदा निर्बंध कडक करण्यात आले आहे. परंतु, व्यापाऱ्यांनी दुकानं उघडणारच अशी ठाम भूमिका घेतली होती. अखेर कोल्हापूर पोलिसांनी व्यापाऱ्यांची समजूत काढण्यात यशस्वी झाले असून व्यापाऱ्यांनी आपला निर्णय रद्द केला आहे.

गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊनमुळे व्यापार बुडाला. आता कशीबशी दुकानं सुरू केली होती. पण, परत दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत दुकानं सुरू करणारच अशी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली होती.

सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवेमधील दुकान उघडायला परवानगी देण्यात आली आहे मात्र चेंबर ऑफ कॉमर्सन आज सगळी दुकानं नऊ वाजल्यापासून उघडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर कोल्हापूर पोलीस आयुक्तांनी व्यापाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. अखेर  व्यापाऱ्यांना समजवण्यात पोलिसांना यश आले आहे.

व्यापाऱ्यांनी दोन दिवसांची मुदत देऊन सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे.  दोन दिवसात निर्णय झाला नाही तर व्यापारी आपली सर्व दुकानं सुरू ठेवतील, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला. तसंच, ग्रामीण आणि शहरी भाग असा वेगळा पॉझिटिव्हीटी रेट काढण्याची व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे.  त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि व्यापाऱ्यांमधील संघर्ष  टळला आहे.

'कोल्हापुरात निर्बंध कडक'

कोल्हापूरमध्ये (kolhapur) निर्बंध शिथिल करण्यात आल्यानंतर ठिकठिकाणी गर्दी वाढली होती. त्यामुळे कोरोना नियम पायदळी तुडवण्यात आल्याचे चित्र पाहण्यास मिळाले. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. गेल्या सप्ताहातील कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 16 टक्क्यांवर पोहोचला. त्यामुळे शिथिल करण्यात आलेले नियम आता पुन्हा एकदा कडक करण्यात आले असून नवीन निर्बंध लागू करण्यात आले आहे. जिल्ह्याचा स्तर चौथ्या लेव्हलमध्ये पोहोचला आहे.

अशी आहे नियमावली

- नागरिकांनी अत्यावश्यक सेवा, तातडीची वैद्यकीय गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.

- अत्यावश्यक सेवा, किराणा दुकाने, बेकरी इत्यादी दुकाने सकाळी 7 वाजल्यापासून ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मात्र, नागरिकांनी दुकानात न जाता घरपोच सेवा मागवावी. अत्यावश्यक बाब नसेल तर अत्यावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर पडू नये.

- हॉटेल्स, रेस्टॉरंट यांनी फक्त घरपोच सेवा द्यावी.

- शेती व शेतीशी निगडीत त्याचप्रमाणे मान्सून पूर्व करावयाची सर्व कामे सुरू ठेवावीत.

- अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत सुरू तर शनिवार रविवार पुर्णपणे बंद

- मॉल्स, सिनेमागृहं संपूर्ण बंद

- रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 वाजेपर्यंत आसनक्षमतेच्या पन्नास टक्के क्षमतेने आणि शनिवार-रविवार फक्त पार्सल सेवा 11 पर्यंत.

 - खाजगी कार्यालयं कामाच्या दिवशी पन्नास टक्के क्षमतेने दुपारी 4 वाजेपर्यंत

Published by: sachin Salve
First published: June 28, 2021, 1:25 PM IST

ताज्या बातम्या