Home /News /kolhapur /

फावडं डोक्यात घालून पाडला रक्ताचा सडा, कोल्हापुरात मुलाकडून बापाची निर्घृण हत्या, कारण समोर

फावडं डोक्यात घालून पाडला रक्ताचा सडा, कोल्हापुरात मुलाकडून बापाची निर्घृण हत्या, कारण समोर

(फोटो- लोकमत)

(फोटो- लोकमत)

Murder in Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील माले याठिकाणी एक तरुणानं आपल्या वडिलांची निर्घृण हत्या (Father brutal murder by son) केली आहे.

    पन्हाळा, 11 डिसेंबर: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याच्या पन्हाळा तालुक्यातील माले याठिकाणी एक तरुणानं आपल्या वडिलांची निर्घृण हत्या (Father brutal murder by son) केली आहे. आरोपी तरुणानं लोखंडी फावडं वडिलांच्या डोक्यात घालून (Attack with iron shovel) रक्ताचा सडा पाडला आहे. हा घाव इतका गंभीर होता की वडिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडल्यानंतर, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पहाटे आरोपी मुलाला अटक (accused son arrested) केली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. भिकाजी शंकर वगरे असं हत्या झालेल्या 47 वर्षीय वडिलांचं नाव आहे. तर अजित वगरे असं अटक झालेल्या 24 वर्षीय आरोपी मुलाचं नाव आहे. दोघंही पन्हाळा तालुक्यातील माले येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत भिकाजी वगरे याचं गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध सुरू होते. त्यामुळे त्यांचे पत्नी आणि मुलासोबत सतत वाद होत होता. हेही वाचा-Love Triangle चा भररस्त्यात तमाशा, पत्नीनं पती आणि गर्लफ्रेंडला धू-धू धुतलं घटनेच्या दिवशी गुरुवारी सायंकाळी देखील भिकाजी यांचा आपल्या पत्नीसोबत याच कारणातून वाद झाला होता. त्यामुळे चिडलेल्या भिकाजी यांनी आपल्या पत्नीला मारहाण केली. यावेळी मुलगा अजित याने 'आईला का मारहाण करता' असा जाब आपल्या वडिलांना विचारला. यातून बापलेकात वाद वाढत गेला. यावेळी संताप अनावर झाल्याने 24 वर्षीय अजित याने वडील भिकाजी यांच्या डोक्यात लोखंडी फावड्याने घाव घातले. हा हल्ला इतका भयावह होता, की भिकाजी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. ही घटना गुरुवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे. हेही वाचा-Buldhana: 'आई वडील किती दिवस पैसे देणार', विवंचनेतून विद्यार्थ्यानं संपवलं जीवन या घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केलं, याठिकाणी उपचार सुरू असतानाच भिकाजी यांची प्राणज्योत मालवली आहे. या घटनेची माहिती कोडोली पोलिसांना मिळताच पोलिसांनी आरोपी मुलगा अजित वगरे यास पहाटेच्या सुमारास अटक केली आहे. घरातील एका कर्त्या पुरुषाची हत्या आणि दुसरा कर्ता पुरुष गजाआड झाल्याने कुटुंबातील वयोवृद्ध आजी, आई, पत्नी आणि लहान बाळ निराधार झाले आहेत. या घटनेचा पुढील तपास कोडोली पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur, Murder

    पुढील बातम्या