Home /News /kolhapur /

'असं कुठं असतं काय'; गणेशोत्सवात पोलिसांच्या कडक नियमाला आमदारही वैतागले, पाहा VIDEO

'असं कुठं असतं काय'; गणेशोत्सवात पोलिसांच्या कडक नियमाला आमदारही वैतागले, पाहा VIDEO

आमदार आणि पोलिसांमधील वादाचा हा VIDEO समोर आला आहे.

    सोलापूर, 15 सप्टेंबर : गणेशोत्सवात कोरोनाची (Coronavirus) रुग्णसंख्या वाढण्याची भीती असल्यामुळे राज्य सरकारने यादरम्यान कडक निर्बंध घातले आहे. अगदी गणेशाच्या विसर्जनासाठीही चौपाट्यांवर भक्तांनी गर्दी करू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेने ठिकाठिकाणी कृत्रिम हौद उभारले आहे व येथेच विसर्जन करण्याची सक्त ताकीद दिली आहे. केवळ मुंबई-पुण्यातच नव्हते तर महाराष्ट्रभरात गणेशोत्सवादरम्यान (Ganeshotsav in Maharashtra) कडक निर्बंध (Strict Rules) घालण्यात आले आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार असल्यामुळे हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. असे असले तरी अनेकांना या नियमांमुळे त्रास होत आहेत. अनेक नागरिकांनी तर राज्य सरकारचे नियम अतिरेकी असल्याचं म्हटलं आहेच, मात्र सोलापूर बार्शीतील (Solapur News) आमदारांनाही हे नियम अतिरेकी वाटत असल्याचं या व्हिडीओमधून दिसत आहे. सोलापुरातील बार्शीमध्ये आमदार (Barshi MLA) आणि पोलीस अधिकाऱ्यांची बाचाबाची झाली. गणेशोत्सवात लागू केलेल्या कडक नियमांमुळे हा वाद झाल्याचं दिसत आहे. हे ही वाचा-Ganesh Chaturthi: राजकीय नेत्यांच्या घरी बाप्पा विराजमान, पहा फोटो आणि VIDEO मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बार्शीमध्ये पोलिसांची कारवाई सुरु होती. कारवाईला आक्षेप घेत बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांनी केला हस्तक्षेप केला. आणि गणेशोत्सवात लागू केलेल्या कडक नियमांवर सवाल उपस्थित केला. भारतात असे तालिबानी नियम नसल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. गणपती मंडळासमोर गर्दी जमावल्या प्रकरणी बार्शी शहर पोलिसांची कारवाई सुरू केली होती. यावेळी आमदार राजेंद्र राऊत यांची पोलिसांशी बाचाबाची झाली.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus, Solapur, Video

    पुढील बातम्या