मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

सहा मुलं-पत्नी आणि धनंजय मुंडे, करुणा शर्मा घेऊन येताय प्रेमकहाणीवर पुस्तक!

सहा मुलं-पत्नी आणि धनंजय मुंडे, करुणा शर्मा घेऊन येताय प्रेमकहाणीवर पुस्तक!

 धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्या आहे. करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार आहे.

धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्या आहे. करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार आहे.

धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्या आहे. करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार आहे.

  • Published by:  sachin Salve
कोल्हापूर, 24 मार्च :  कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीमुळे (Kolhapur by election) राजकीय आखाडा तापला आहे. आता या निवडणुकीत करुणा शर्मा मुंडे (Karuna Sharma Munde) यांनी एंट्री केली आहे. करुणा शर्मा मुंडे यांनी आज शेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसंच, धनंजय मुंडे (Dhananjay Munde)  यांच्यासोबत प्रेमसंबंधावर पुस्तक येणार आहे, असंही करुणा शर्मांनी जाहीर केलं. कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीच्या अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे.  करुणा शर्मा मुंडे यांनी शिवशक्ती सेनेतर्फे स्वतः रिंगणात उतरणार अशी घोषणा केली होती. आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यांच्या नावबाबत तांत्रिक मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे. (घरापासून केवळ 20 मिनीटाच्या अंतरावर आहे Virat ,पण ... Kohli नं व्यक्त केली खंत) याबाबत त्यांना विचारणा केली असता, 'माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहे. उलट धनंजय मुंडे यांनी सहा-सहा मुले आणि अनेक पत्नी लपवल्या आहे. करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार आहे. त्यावर काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना आता अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येणार आहेत. माझ्याकडे सर्व कायदेशीर पुरावे आहेत. त्यामुळे अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही,  असा खुलासाच करुणा मुंडे यांनी केला. (IPL स्पर्धेच्या दरम्यान घातपाताचा कट! वानखेडेची रेकी केल्याची दहशतवाद्याची कबुली) यापूर्वी आमच्या दोघांवर सिनेमा काढल्यावर तो हिट होईल असे वक्तव्य त्यांनी केले होते तर आज आमच्या प्रेम-कहाणीवरचे पुस्तक अंतिम टप्यात असून त्यातून अनेक पुरावे समोर आणणार असल्याचे शर्मा यांनी स्पष्ट केलं. विशेष म्हणजे, मध्यंतरीच्या काळात धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी बलात्काराचा आरोप केला होता. हे प्रकरण पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले होते. पण, रेणू शर्माने आपले सर्व आरोप मागे घेतले होते. त्यामुळे धनंजय मुंडेंना दिलासा मिळाला होता.
First published:

Tags: Dhananjay munde, Kolhapur

पुढील बातम्या