Home /News /kolhapur /

सोशल मीडियावर अश्लील मेसेज करणं पडलं महागात, कोल्हापुरातील तरुणाला पुण्यातील पोरीनं दाखवला इंगा

सोशल मीडियावर अश्लील मेसेज करणं पडलं महागात, कोल्हापुरातील तरुणाला पुण्यातील पोरीनं दाखवला इंगा

Crime in Kolhapur: सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून लग्नाच्या बहाण्याने पुण्यातील तरुणीसोबत अश्लील मेसेज (Offensive messages) करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.

    कोल्हापूर, 29 डिसेंबर: सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधून लग्नाच्या बहाण्याने पुण्यातील तरुणीसोबत अश्लील मेसेज (Offensive messages) करणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. आरोपी तरुणाने हे कृत्य करताच, पीडितेनं पुण्यातील (Pune) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. गुन्हा दाखल (FIR lodged) झाल्यानंतर पुणे पोलिसांनी कोल्हापुरातील (Kolhapur) करवीर येथून आरोपी तरुणाची उचलबांगडी केली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक (Accused arrested) केली असून पुढील चौकशीसाठी पुण्यात आणलं आहे. या घटनेचा पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत. नीलेश सुरेश कांबळे असं अटक झालेल्या 30 वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. आरोपीनं काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातील तरुणीशी संपर्क साधला होता. यानंतर त्याने लग्नाच्या बहाण्याने पीडित मुलीशी अश्लील संभाषण केलं होतं. आरोपीनं पीडित मुलीला मोबाइलवर संपर्क साधून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी अश्लील संभाषण करत पीडितेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं होतं. हेही वाचा-NCP नगरसेवकाच्या मुलाचा विवाहितेवर बलात्कार; जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार हे प्रकरण केवळ एवढ्यावरच थांबलं नाही तर त्याने पीडित तरुणीला फोन करून अश्लील शब्दात शिवीगाळ देखील केली आहे. तसेच फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर बदनामी करेल, अशी धमकीही आरोपीनं दिली. आरोपीच्या या कृत्यानंतर पीडित तरुणीनं स्वारगेट पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या अधारे आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. हेही वाचा-प्रेमविवाह करूनही नशिबी आला वनवास; आईने चिमुकल्याच्या डोळ्यादेखत संपवलं जीवन पण आरोपी नेहमी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला. अखेर तांत्रिक तपासानंतर आरोपी नीलेश कांबळे हा कोल्हापुरातील करवीर तालुक्याच्या केर्ली येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पुणे पोलिसांनी करवीर पोलिसांच्या मदतीने केर्ली येथे जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपासासाठी पोलिसांनी आरोपीला पुण्यात आणलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime, Kolhapur, Pune

    पुढील बातम्या