कोल्हापूर, 10 जून : 'आता मराठा समाज बोललाय, आम्ही बोललोय आता तुम्ही म्हणजेच लोकप्रतिनिधींनी बोलायचंय असं ठणकावत राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje) यांनी लोकप्रतिनिधींना म्हणजेच राज्यकर्त्यांना चांगलाच दणका दिला आहे. तसंच, पुणे (Pune) ते मंत्रालय (mantralaya) लाँग मार्च काढण्याचा इशाराही संभाजीराजेंनी दिला.
कोल्हापूरमध्ये आज मराठा समाजाची मराठा आरक्षणासाठी (maratha reservation) महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. 16 जूनला दिवशी कोल्हापूरमध्ये आंदोलन होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
सुशांत कोणत्याचं ऑडिशनमध्ये झाला नव्हता अपयशी; मुकेश छाबरांचा VIDEO होतोय VIRAL
'आंदोलन करायच आहे पण मोर्चा काढायचा नसून मूक आंदोलन करायच आहे. असं सांगत आंदोलनस्थळी मराठा समाजातील समन्वयक, विद्यार्थी एका बाजूला असणार आहेत आणि समोरच्या बाजूला आमदार-खासदार आणि मंत्री असणार आहेत आणि त्या दिवशी मी बोलणार नाही' असं संभाजीराजेंनी स्पष्ट केलं.
तसंच, 'लोकप्रतिनिधींनी बोलायचं आणि सरकारने जर याची देखील दखल घेतली नाही तर एकदाच जोर लावायचा आहे तो म्हणजे, पुण्यापासून मंत्रालयावर लॉंग मार्च काढायचा आहे, असा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिला.
ज्येष्ठ नागरिकांना मिळेल मोठा फायदा, 30 जूनपर्यंत या बँका देतायंत चांगली संधी
कोल्हापूरनंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर आणि रायगड या चार ठिकाणी आंदोलन होणार असून कोल्हापूरमधल्या आंदोलनाप्रमाणेच राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये आंदोलन होणार असल्याची माहितीही संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.