Home /News /kolhapur /

पुरात अडकलेल्या गंभीर कोरोना रुग्णाची NDRF च्या टीमकडून सुटका; कोल्हापुरातील LIVE VIDEO

पुरात अडकलेल्या गंभीर कोरोना रुग्णाची NDRF च्या टीमकडून सुटका; कोल्हापुरातील LIVE VIDEO

कठीण परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता NDRF चे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. कोल्हापुरातील असाच एक व्हिडिओ (Kolhapur Video) सध्या समोर आला आहे.

    कोल्हापूर 27 जुलै : राज्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं हाहाकार माजवला आहे. सततच्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये महापूर आला असून याचा फटका नागरिकांना बसला आहे. यात कोल्हापूर जिल्ह्याचाही समावेश (Heavy rainfall in Kolhapur) आहे. मात्र, या कठीण परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता NDRF चे जवान पुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी धावून जात आहेत. कोल्हापुरातील असाच एक व्हिडिओ (Kolhapur Video) सध्या समोर आला आहे. पूरग्रस्त भागात मृत्यूतांडव! 164 जणांनी गमावले प्राण, 25564 जनावरांचा पडला खच सोमवारी कोल्हापूरच्या शिरोळी येथे पूरात अडकलेल्या एका कोरोना रुग्णाला NDRF च्या टीमनं सुखरूप बाहेर काढलं (NDRF Team Rescued a Covid Patient) आहे. एनडीआरएफचे सहायक कमांडंट विक्रम यांनी सांगितलं, की आम्ही एका कोरोना रुग्णाला सुखरूप बाहेर काढलं आहे. या रुग्णाची ऑक्सिजन पातळी (Oxygen Level ) भरपूर खालावली होती. त्यांची ऑक्सिजन लेवल 60 वर आली होती. NDRF च्या टीमनं त्यांना सुखरूप बाहेर काढत रुग्णालयात दाखल केलं आहे. या घटनेचा व्हिडिओदेखील समोर आला आहे. पूरग्रस्त पाहणी दौऱ्यादरम्यानच अजित पवारांनी सांगलीकरांना दिलं हे आश्वासन कोल्हापूर जिल्ह्यात आता पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांची महापुरातून सुटका होणार आहे. पण अजूनही अनेक भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी भूस्खलन होण्याच्या घटना समोर आल्या होत्या. जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Rain flood, Rain in kolhapur, Viral videos

    पुढील बातम्या