Home /News /kolhapur /

राज गर्जनेनंतर आता कोल्हापुरात राष्ट्रवादीची संकल्प सभा, शरद पवारांकडे राज्याचं लक्ष

राज गर्जनेनंतर आता कोल्हापुरात राष्ट्रवादीची संकल्प सभा, शरद पवारांकडे राज्याचं लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संकल्प सभेच्या निमित्ताने भोंगे पुनः एकदा चर्चेत आला. आहे. उद्या शनिवारी 23 एप्रिलला कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या वतीन संकल्प सभेचे आयोजन केले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या (MNS Chief Raj Thackeray) वक्तव्यातील भोंग्यांना पुरोगामीत्वाचा भोंग्यांनी उत्तर दिलं जाईल, असा सांगण्यात आहे.

पुढे वाचा ...
मुंबई, 22 एप्रिल : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संकल्प सभेच्या (NCP Sankalp Sabha) निमित्ताने भोंगे पुनः एकदा चर्चेत आला. आहे. उद्या शनिवारी 23 एप्रिलला कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या वतीन संकल्प सभेचे आयोजन केले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या  (MNS Chief Raj Thackeray) वक्तव्यातील भोंग्यांना पुरोगामीत्वाचा भोंग्यांनी उत्तर दिलं जाईल, असा सांगण्यात आहे. मात्र, तरी या संकल्प सभेत राष्ट्रवादीच्या अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) नेमकं काय उत्तर देतील? याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. राष्ट्रवादीने जाहीर केला सभेचा संदेश राष्ट्रवादी काँग्रेसने समाज माध्यमांवर संदेश जाहीर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की 'जाती धर्माच्या पलीकडे बोलणारं कुणी आहे. उन्नती आणि प्रगती तोलणारं कुणी आहे. कुणीतरी आहे जो होईल पुरोगामीत्वाचा भोंगा. कुणीतरी आहे जो दाखवेल स्वार्थाला ठेंगा. प्रगतीकर्ता व्हा. प्रगती करता या.', असे आवाहन राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात आलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याच्या (Gudhi Padwa) दिवशी मुंबईत जाहीर सभा घेत मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात भूमिका घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार हल्लाबोल केला. हे वाचा - राणा दाम्पत्याचा गनिमी कावा? शिवसैनिक रोखणार असल्याचं कळताच पहाटेच मुंबईत दाखल? भोंग्याच्या प्रकरणावरुन सध्या महाराष्ट्रभर राजकारण तापलं असून प्रशासनाकडून शांततेच आवाहन केलं जात आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. गुढीपाडवा सभा आणि त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेत राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला होता. येत्या 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी औरंगाबादेत जाहीर सभेचं (Raj Thackeray Rally in Aurangabad) आयोजन केलं आहे. या सभेला विरोधही होताना दिसत आहे. राष्ट्रवादीचे मंत्री जयंत पाटलांची राज यांच्यावर टीका - दरम्यान, राज ठाकरे यांच्या भूमिकेवर जयंत पाटील यांनी टीका केली आहे. "राज ठाकरे आता अयोध्येला चालले आहेत. ते तिथे जातील. पण ते तिथे नेमके कशासाठी जात आहेत ते माहिती नाही. दर्शनासाठी जात आहेत की भोंगे वाजवायला जात आहेत, याबाबत त्यांचा कार्यक्रम काय ते मला माहिती नाही. पण राज ठाकरेंनी भारतीय जनता पक्षाच्या हातातील बाहुलं बनून काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांची सर्व सुसज्य व्यवस्था तेथील योगी सरकारने केलेली दिसत आहे", अशी टीका जयंत पाटलांनी केली.

तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

Published by:News18 Desk
First published:

Tags: NCP, Raj Thackeray, Sharad Pawar (Politician)

पुढील बातम्या