कोल्हापूर, 02 एप्रिल: मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह (Param bir singh) यांनी सचिन वाझे (Sachin Vaze) प्रकरणात लेटर बॉम्ब टाकल्यानंतर राज्यातलं वातावरण ढवळून निघालं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेलं हे प्रकरण अजूनही वाढतचं चाललं आहे. दररोज याबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहे. सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या करत आहेत. आता याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषद (Hasan Mushrif Press Conference) घेऊन विरोधकांवर तोफ डागली आहे.
त्यांनी परमबीर सिंह यांच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित करत, भाजपवर निशाणा साधला आहे. मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह भाजपचे डार्लिंग झाले आहेत, अशी बोचरी टीका हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असलेले सचिन वाझे हे परमबीर सिंह यांचे जवळचे मित्र आहेत. संबंधित प्रकरणात परमबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार होतं, असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे. हे प्रकरण आता अंगाशी येत असल्याचं पाहून देवेंद्र फडणवीस आता गप्प का आहेत? असा सवालही त्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
हे ही वाचा - Sachin Vaze यांचा आणखी 'कार'नामा समोर,महागडी गाडी नवी मुंबईच्या रस्त्यावर सापडली
त्याचबरोबर, हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांचीही खरडपट्टी केली आहे. त्यांनी नवीन कुमार जिंदल यांच्या वक्तव्याचा निषेध करताना म्हटलं की, भाजपने याप्रकरणी लवकरात लवकर माफी मागावी, अन्यथा आमच्याकडूनही अशाप्रकारची वक्तव्ये केली जातील. मग कुणाच्या पाठीतून आणि कुणाच्या डोक्यातून कळा येतात हे समजेल. शरद पवारांवर अशा शब्दांत टीका करायला जिंदालला लाज नाही का वाटली? अशा शब्दांत हसन मुश्रीफ यांनी भाजपवर खोचक टीका केली आहे. दोन दिवसांत माफी मागा अन्यथा राष्ट्रवादी जशास तसे उत्तर देणार, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
सचिन वाजे ने NIA के सामने अब ऐसा क्या खुलासा कर दिया की शरद पवार अचनाक को इतना तेज पेट दर्द हुआ की उन्हें हॉस्पिटल में भर्ती होना पड़ा है अब तो ऐसा लग रहा है की दाल में कुछ कला नहीं बल्कि पूरी की पूरी दाल ही काली है। #महाराष्ट्र_सरकार
— Naveen Kumar (@naveenjindalbjp) March 29, 2021
काय म्हणाले होते नवीन कुमार जिंदल?
भाजपच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीन कुमार जिंदल यांनी सोमवारी काही ट्विट केले होते. यावेळी जिंदल यांनी शरद पवारांवर निशाणा साधताना आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, ‘सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला असं काय सांगितलं की, शरद पवारांच्या पोटात इतक्या जोरात दुखायला लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आली. आता तर वाटतं की, ‘दाल में कुछ काला नही, पुरी दालही काली है.’ त्यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, NCP, Sharad pawar