Home /News /kolhapur /

kolhapur bank election : राष्ट्रवादी-काँग्रेसने भाजपच्या मदतीने राखला गड, शिवसेनेनं दिली कडवी झुंज!

kolhapur bank election : राष्ट्रवादी-काँग्रेसने भाजपच्या मदतीने राखला गड, शिवसेनेनं दिली कडवी झुंज!


कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली आहे.

कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली आहे.

    कोल्हापूर, 07 जानेवारी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा (Kolhapur District Central Co-operative Bank Election 2022) निकाल लागला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (ncp), काँग्रेस (congress) आणि शिवसेनेतच (shivsena) झुंज पाहण्यास मिळाली. तर भाजपने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला मदत केली. पण, राष्ट्रवादीने गड राखला असला तरी शिवसेना किंगमेकर ठरली आहे.  सत्ताधारी गटातील 8 उमेदवार विजयी झाले आहे तर विरोधी गटातील 6 उमेदवार विजयी झाले आहे. कोल्हापूर जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसची चांगलीच दमछाक झाली आहे.  शिवसेनेनं काँटे की टक्कर दिल्यामुळे निवडणुकीत चांगलीच रंगत आली. 15 जागांपैकी सत्ताधारी गटाला 8 जागा जिंकता आल्या आहेत. तर विरोधी गटाने आतापर्यंत 6 जागांवर मुसंडी मारली आहे. (Instagramवर मैत्री करत अडकवलं जाळ्यात,औरंगाबादेतील तरुणीसोबत घडला विचित्र प्रकार) जिल्हा मध्यवर्ती बँकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची सत्ता होती. पण, जागावाटपाची चर्चा फिसकटल्यानंतर शिवसेनेनं स्वबळावर निवडणूक लढवली. तर भाजपने सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेसला मदत केली. सत्तारूढ गटाचे नेतृत्त्व बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केलं होतं, असं वृत्त दैनिक लोकसत्ताने दिले आहे. (Paytm चं खास फीचर, विना इंटरनेट आणि फोन लॉक असतानाही होणार पेमेंट) तर शिवसेनेचे खासदार संजय मंडलिक आणि शेकापचे माजी आमदार संपतराव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी सत्ताधारी गटाला कडवी झुंज दिली. अखेरीस विरोधी गटाने सहा जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आता आता खासदार मंडलिक यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. अध्यक्षपद शिवसेनाच ठरवणार असल्याचे चित्र आहे. या निकालामुळे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांना मोठा धक्का मानला जात आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या