Home /News /kolhapur /

नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा, पत्रकार बनून माजी सैनिकास लुबाडलं, कृत्य वाचून बसेल धक्का

नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा, पत्रकार बनून माजी सैनिकास लुबाडलं, कृत्य वाचून बसेल धक्का

Crime in Kolhapur: आपण पत्रकार असून मोठ्या अधिकाऱ्यांसोबत आपली ओळख आहे. तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी लावतो, अशी बतावणी करून कोल्हापुरातील एका तरुणाने दोन जणांची लाखोंची फसवणूक केली आहे.

    कोल्हापूर, 31 डिसेंबर: आपण पत्रकार असून मोठ्या अधिकाऱ्यांसोबत आपली ओळख आहे. तुम्हाला मोठ्या पगाराची नोकरी लावून (Lure of job) देतो, अशी बतावणी करून कोल्हापुरातील (Kolhapur) एका तरुणाने दोन जणांची लाखोंची फसवणूक (money fraud) केली आहे. आरोपीनं विविध प्रकारची आमिषं दाखवून संबंधित फिर्यादींची तब्बल दहा लाखांची फसवणूक केली आहे. फिर्यादीचे पैसे घेऊन आरोपी फरार झाला होता. पण पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या (Accused arrested) आहेत. अटक केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने त्याला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निखील चंद्रकांत घोरपडे असं अटक केलेल्या भामट्याचं नाव असून तो हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन वर्षांपूर्वी आरोपी घोरपडे हा करवीर तालुक्यातील पाचगाव याठिकाणी एका माजी सैनिकाच्या घरी भाडेकरू म्हणून राहत होता. आपण पत्रकार असून मुंबई रेल्वेतील वरिष्ठ अधिकारी आपल्या ओळखीचे असल्याचं सांगत आरोपीनं फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर आरोपीनं माजी सैनिकाच्या मुलास रेल्वेत नोकरी लावण्याचं आमिष दाखवून साडेपाच लाख रुपये द्यावे लागतील, असं सांगितलं. हेही वाचा-एका चपलेवरून लागला आरोपींचा शोध, फिल्मी स्टाईलने दरोडेखोरांना अटक यानंतर आरोपीच्या मागणीनुसार, फिर्यादीनं 2 जून ते 5 सप्टेंबर 2019 दरम्यान आरोपीला रोख रक्कम, चेक, फोन पे द्वारे एकूण 4 लाख 76 हजार रुपये दिले. पैसे घेतल्यानंतर आरोपी अचानक गायब झाला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं कळाल्यानंतर माजी सैनिकानं 27 जून 2021 रोजी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हेही वाचा-चोरट्यांनी दिवसाढवळ्या लुटले लाखो, पोलीस बसले हद्दीवरून भांडत; नागरिकांचा संताप आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने करवीर तालुक्यातील वाशी येथील आणखी एका तरुणाला तब्बल 5 लाख 89 हजार 200 रुपयांना गंडा घातला आहे. आरोपीनं फिर्यादी तरुणाला पोलीस आयुक्तालयात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून लुबाडलं होतं. तसेच आरोपींनी फिर्यादी युवकास ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात सहायक पोलीस उपनिरीक्षक या पदावर तातडीने नियुक्ती झाल्याबाबत बनावट नियुक्ती पत्र देखील दिलं. पण आली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर, संबंधित तरुणानं देखील मुख्य आरोपी निखील घोरपडे याच्यासह साथीदार अनिकेत कासार (रा. कोल्हापूर) व उदय देसाई (रा. ठाणे शहर) यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी निखील घोरपडे याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास करवीर पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur

    पुढील बातम्या