Home /News /kolhapur /

Kolhapur: पतीच जुळवायचा पत्नीचं लग्न; लग्नाळू तरुणांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

Kolhapur: पतीच जुळवायचा पत्नीचं लग्न; लग्नाळू तरुणांची फसवणूक करणारी टोळी गजाआड

Crime in Kolhapur: लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना हेरून त्यांची लाखोंची आर्थिक फसवणूक (Money fraud) करणाऱ्या इचलकरंजी येथील टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

    कोल्हापूर, 16 डिसेंबर: लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांना हेरून त्यांची लाखोंची आर्थिक फसवणूक (Money fraud) करणाऱ्या इचलकरंजी येथील टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश (Racket exposed) केला आहे. याबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर, राधानगरी पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या (3 accused arrested) आवळल्या आहेत. अटक केलेल्या आरोपींची कसून चौकशी केली जात असून अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे. या प्रकरणातील अन्य काही संशयित फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. फिरोज शेख, समिना शेख आणि वैशाली शिंदे अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावं आहेत. तर विक्रम केशव जोगम असं 24 वर्षीय फिर्यादी तरुणाचं नाव असून तो राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली परिसरातील जोगमवाडी येथील रहिवासी आहे. फिर्यादी विक्रम याने राधानगरी पोलीस ठाण्यात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-विवस्त्र फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, साताऱ्यात दिराचा वहिनीवर बलात्कार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विक्रम याचं 22 जून 2021 रोजी 38 वर्षीय आरोपी महिला वैशाली संजय शिंदे हिच्याशी विवाह झाला होता. हा विवाह ठरवण्यासाठी महिलेचा पती संजय विठ्ठल शिंदे, फिरोज बाबू शेख आणि समिना फिरोज शेख यांनी फिर्यादीकडून 1 लाख 5 हजार रुपयांची रोकड घेतली होती. तसेच आरोपींनी वैशाली हीचं याआधी तीन विवाह झाल्याची माहिती देखील लपवली होती. फिर्यादीकडून मिळालेल्या रक्कम आरोपींनी आपसात वाटून घेतली होती. हेही वाचा-मित्र पत्नीवर करायचे रेप अन् पतीला व्हायचा आनंद; 3 वर्षे सुरू होता भयावह प्रकार पण लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच आरोपींचं बिंग फुटलं आहे. या प्रकरणी तरुणानं राधानगरी पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आर्थिक फसवणूक केल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला असून तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. संबंधित आरोपींची कसून चौकशी केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास राधानगरी पोलीस करत आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur

    पुढील बातम्या