Maratha Kranti Muk Andolan: मराठा क्रांती मूक आंदोलनाची रूपरेषा; पाहा कसे होईल आंदोलन

Maratha Kranti Muk Andolan: मराठा क्रांती मूक आंदोलनाची रूपरेषा; पाहा कसे होईल आंदोलन

Marahta Kranti Andolan Kolhapur: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 16 जून 2021 रोजी कोल्हापूर येथे मूक आंदोलन होणार आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 15 जून: मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरुन बुधवारी (16 जून 2021) रोजी कोल्हापूर (Kolhapur) येथे मूक आंदोलन (Muk Andolan) होणार आहे. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. या आंदोलनाची रूपरेषा जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली सुद्धा जाहीर केली आहे. पाहूयात कशी आहे आंदोलनाची रूपरेषा आणि नियमावली.

मराठा क्रांती मूक आंदोलनाची रूपरेषा

9:00 - पर्यंत महाराष्ट्रातील सर्व समन्वयकांनी आंदोलन स्थळी पोहचणे

9:50 - समन्वयक, तरादुत, नोकर भरतीची मुले आणि लोकप्रतनिधींनी स्थानापन्न होणे

10:00 - छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेला युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यानंतर, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात.

10:10 - लोकप्रतिनिधींनी राजशिष्टाचारनुसार मनोगत किंवा आपापली जबाबदारी निश्चित करण्यास सुरुवात करतील.

1:00 - राष्ट्रगीताने मराठा क्रांती मूक आंदोलनाची सांगता.

1:15 - महाराष्ट्रातील समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांच्यासोबत लाँग मार्च संदर्भात चर्चा करण्यासाठी बैठक. श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती मार्गदर्शन करतील.

यासोबतच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी काही नियम निश्चित करण्यात आले आहेत. या संदर्भातील नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली आहे. पाहूयात काय आहेत नियम आणि कशी आहे ही नियमावली.

सर्वांची वेशभूषा काळ्या रंगाची असावी

प्रत्येकाने दंडावर काळी फीत बांधून येणे

प्रत्येकाने काळा मास्क वापरावा

शक्यतो सोबत येताना सॅनिटायझर आणावे

आंदोलनाच्या स्थळी आपल्यामुळे इतरांना त्रास होईल, असे कोणतेही वर्तन करू नये

कोरोनाच्या नियमांचे पालन करावे

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजासोबतच विविध मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. सकल मराठा समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. आरक्षण मिळावे अशी मागणी अजून जोर धरत आहे. उद्या शाहू महाराजांच्या समाधी स्थळावर अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनाला सुरूवात होणार आहे.

Published by: Sunil Desale
First published: June 15, 2021, 8:08 PM IST

ताज्या बातम्या