Maratha kranti andolan Kolhapur : 'पंतप्रधानांनी ठरवलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं', श्रीमंत शाहू छत्रपती यांचं मोठ विधान

Maratha kranti andolan Kolhapur : 'पंतप्रधानांनी ठरवलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं', श्रीमंत शाहू छत्रपती यांचं मोठ विधान

Maratha kranti andolan Kolhapur LIVE 'एकाच व्यक्तीने हे घडवून आणणे हे शक्य नाही. यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. राज्यातील 48 खासदारांनी दिल्लीत आवाज वाढवला पाहिजे.

  • Share this:

कोल्हापूर, 16 जून : 'मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. मराठा आरक्षण विषय पुन्हा पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी' अस परखड मत श्रीमंत शाहू छत्रपती (shahu chhatrapati ) यांनी मत मांडलं. तसंच, 'पंतप्रधान मोदी यांनी ठरवलं तर नक्कीच मराठा आरक्षण मिळू शकतं' असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनात (Maratha kranti andolan Kolhapur) छत्रपती शाहू यांनी आपली भूमिका मांडत मराठा समाजाला लवकरात लवकर आंदोलन मिळाले पाहिजे, अशी मागणी केली आहे.

'एकाच व्यक्तीने हे घडवून आणणे हे शक्य नाही. यासाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे. राज्यातील 48 खासदारांनी दिल्लीत आवाज वाढवला पाहिजे. केंद्रात बहुमतात सरकार आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हा विषय मांडावा लागणार आहे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी. कायदेशीर लढाईपेक्षा घटना दुरूस्ती केली तर हा विषय लवकर सुटू शकतो' असंही छत्रपती शाहू म्हणालं.

पतीला तोंडानं ऑक्सिजन देतानाचा फोटो झालेला व्हायरल, आता कशी आहे महिलेची अवस्था?

'मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी त्यासाठी खासदारांनी आग्रह धरावा लागणार आहे. केंद्राकडे मागणी करावी लागणार आहे.  संसदेत 2/3 खासदार आपल्या बाजूने वळवावे लागतील. पंतप्रधान मोदी यांनी ठरवलं तर नक्कीच मराठा आरक्षण मिळू शकतं', असंही  छत्रपती शाहू म्हणाले.

'संभाजीराजेंनी उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्र्यांशी बोलूया'

'मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी महाविकास सरकार कटीबद्ध आहे. चर्चा करून यावर तोडगा निघू शकतो, त्यामुळे संभाजीराजे यांनी उद्या मुंबईला यावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार भेट देतील' असं म्हणत कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी आंदोलनातच निमंत्रण दिले आहे.

सतेज पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधत संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेचं निमंत्रण दिलं आहे.  'महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारकडेही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आहे. त्यामुळे चर्चेतूनच यावर आता तोडगा निघू शकतो. पालकमंत्री म्हणून माझं जाहीर निमंत्रण आहे की, उद्या राजेंनी मुंबईत यावं. उद्याच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देतील. आपण आणि सरकार मध्ये चर्चा व्हावी'

Published by: sachin Salve
First published: June 16, 2021, 12:44 PM IST
Tags:

ताज्या बातम्या