मराठी बातम्या /बातम्या /kolhapur /

Maratha kranti andolan Kolhapur : ...पण मी एकटा मुंबईला जाणार नाही, संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

Maratha kranti andolan Kolhapur : ...पण मी एकटा मुंबईला जाणार नाही, संभाजीराजेंनी स्पष्ट केली भूमिका

त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे'

त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे'

त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे'

  • Published by:  sachin Salve

कोल्हापूर, 16 जून : 'राज्य सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे, त्याचं स्वागत आहे. पण मी एकटा चर्चेला जाणार नाही. मराठा समन्यवक ठरवतील चर्चेसाठी कोण-कोण जाणार आहे, त्यानंतर चर्चेसाठी जाण्याबद्दल निर्णय घेऊ', असं खासदार संभाजीराजे (sambhaji raje) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलन (Maratha kranti andolan Kolhapur) यशस्वीपणे संपन्न झाले. आंदोलनानंतर मराठा समन्वयक आणि आंदोलकांशी संभाजीराजे यांनी संवाद साधला.

'आपण अनेक पर्याय त्यांना दिले होते. पण, त्याबद्दल फारसं कुणी बोललं नाही. आमचा सर्वांचा अभ्यास झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, अशोक चव्हाण आणि इतर मंत्री आपल्या भेटीसाठी तयार आहे. त्यांनी आपल्यासाठी चर्चेसाठी दारं उघडली आहे ही आपल्यासाठी चांगली बाब आहे' असं संभाजीराजे म्हणाले.

FD करतांय तर लक्ष द्या! 'या' बँकांमध्ये मिळतोय चांगला व्याजदर, वाचा सविस्तर

'पण मी चर्चेसाठी एकटा जाणार नाही. अजित पवार यांनी याआधी सुद्धा मला 4 जून रोजी फोन केला होता. की आपण मुंबईमध्ये भेटू. पण मी त्यांना सांगितलं. आम्ही आमच्या आमच्या मागण्या मांडल्या आहे. मी एकटा तुम्हाला कशाला भेटू. उद्या कुणी म्हटलं ही सगळं काही मॅनेज झालं तर काय करायचं. त्यामुळे मी ठरवलं आहे, भेटायचं असेल तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री असले पाहिजे आणि सकल मराठा समाजाचे प्रमुख समन्यवक पाहिजे, त्यावेळी चर्चा होऊ शकते' असा खुलासाही संभाजीराजेंनी केला.

शिवरायांच्या दुर्मिळ चित्रांचा लागला शोध; परदेशातील संग्रहालयात होते सुरक्षित

'त्यांनी नऊ दिवस झाले काही निर्णय घेतला नाही, त्यामुळे आज आंदोलन करावे लागले. आम्ही त्यांच्या चर्चेचं स्वागत करतो. मराठा समाजासाठी आमच्या मागण्या मान्य करत असतील, लावून धरत असतील तर ते चांगलंच आहे. आम्ही सुद्धा माणसं आहोत, विषय ताणून धरणाच्या आमचा विचार नाही. पण, मी एकटा भेटायला जाणार नाही. मराठा समन्यवकांनी ठरवावं, कोण-कोण चर्चेला येणार आहे, तुम्ही ठरवावं, आपण मार्ग काढूया' असंही संभाजीराजे म्हणाले.

'...तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही'

'लाँग मार्च काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय आहे, शेवटचे अस्त्र आहे. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं आहे की, समाजाला वेठीस धरायचं नाही म्हणून आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल किंवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. पण, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. मी बोललोय, आमचा लाँग मार्च काढण्याचा विचार आहे, आम्हाला 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा जायचं नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू' असंही राजे म्हणाले.

First published: