Home /News /kolhapur /

दोन वर्षे लैंगिक शोषण करत दोनदा घडवला गर्भपात; कोल्हापुरात नराधमानं गाठला अमानुषतेचा कळस

दोन वर्षे लैंगिक शोषण करत दोनदा घडवला गर्भपात; कोल्हापुरात नराधमानं गाठला अमानुषतेचा कळस

आरोपीनं ऑक्टोबर 2019 ते 28 जुलै 2021 पर्यंत पीडित तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे.

आरोपीनं ऑक्टोबर 2019 ते 28 जुलै 2021 पर्यंत पीडित तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे.

Crime in Kolhapur: लग्नाचं आमिष दाखवून (Lure of marriage) सलग दोन वर्षे एका महिलेचं लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे.

    कोल्हापूर, 07 सप्टेंबर: लग्नाचं आमिष दाखवून (Lure  of marriage) सलग दोन वर्षे एका महिलेचं लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरात उघडकीस आली आहे. आरोपीनं केवळ हार घालून लग्न केल्याचं नाटक करत पीडित महिलेची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं नेसरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल (FIR Lodged) करून आरोपीला युवकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. मारुती तातोबा तेऊरवाडकर असं गुन्हा दाखल झालेल्या 25  वर्षीय आरोपी तरुणाचं नाव आहे. तो कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदवड तालुक्यातील कालकुंद्री येथील रहिवासी आहे. पीडित तरुणीनं तक्रार केल्यानंतर संशयित आरोपी मारुती तेऊरवाडकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. आरोपीनं ऑक्टोबर 2019 ते 28 जुलै 2021 पर्यंत पीडित तरुणीचं लैंगिक शोषण केलं आहे. दरम्यान आरोपीनं दोनवेळा पीडितेचा गर्भपात घडवून तिला नरक यातना दिल्या आहे. हेही वाचा-...म्हणून टोकाचं पाऊल उचललं, मला माफ करा; तलाठ्याकडून डॉक्टर पत्नीचा निर्घृण खून पीडित महिला ही मागासवर्गीय समाजातील आहे. तर संशयित आरोपी हा सवर्ण जातीचा आहे. आरोपीनं केवळ पीडितेला हार घालून लग्नाचं नाटक केलं आहे. यानंतर आरोपीनं नेसरी येथील सुंदरनगर वसाहतीत पीडितेच्या घरी राहून तिचं शारीरिक शोषण केलं आहे. दरम्यान आरोपीनं दोनवेळी पीडितेचा गर्भपात देखील केला आहे. हेही वाचा-लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचं घर शोधलं अन्..; तरुणानं GFला दिला भयंकर मृत्यू याशिवाय जेसीबी भाड्यानं घेतो असं सांगून आरोपीनं महिलेचे दागिने बँकेत गहाण ठेवून पीडितेची आर्थिक फसवणूक केली आहे. त्याचबरोबर आरोपीनं पीडितेला काही वेळा मारहाण केल्याचंही पीडितेनं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. याप्रकरणी नेसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Kolhapur, Rape

    पुढील बातम्या