Home /News /kolhapur /

Maharashtra BJP: दोन दिवसांत महाराष्ट्रातील भाजपचे दोन नेते अडचणीत, वादग्रस्त विधानामुळे पक्षाची गोची

Maharashtra BJP: दोन दिवसांत महाराष्ट्रातील भाजपचे दोन नेते अडचणीत, वादग्रस्त विधानामुळे पक्षाची गोची

Maharashtra News: राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भ्रष्टाचार, घोटाळ्यांचे भाजपकडून आरोप केले जात आहेत. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडी, आयकर विभागाच्या धाडीही पडत आहेत. मात्र, त्याच दरम्यान आता भाजपचेही दोन नेते आपल्या वादग्रस्त विधानावरुन अडचणीत आले आहेत.

पुढे वाचा ...
    कोल्हापूर, 31 मार्च : गेल्या दोन दिवसांत भाजपच्या दोन नेत्यांनी केलेल्या विधानामुळे ते अडतणीत (BJP leaders in trouble because of controversial statement) येताना दिसत आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारसभेत माजी खासदार धनंजय महाडीक यांनी जे पती करेल ते पत्नी करू शकणार आहे का असे म्हणत काँग्रेसच्या उमेदवाराला कमी लेखण्याचा प्रयत्न केलाय. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारावेळी धनंजय महाडिक यांनी हे विधान केलं आहे. धनंजय महाडिक (Dhanajay Mahadik) यांनी केलेल्या या वक्तव्याचा महिलांच्याकडून निषेध करण्यात येत आहे. महिलांना कमी लेखण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करत काळ्या साड्या परिधान करत आज महिलांनी त्यांचा निषेध केला. काय म्हणाले होते धनंजय महाडिक? प्रचारसभेत धनंजय महाडिक म्हणाले, काँग्रेसचे लोकं येतील आणि म्हणतील महिला उमेदवार आम्ही दिली आहे. तुम्ही सर्व महिला आहात, ती बिचारी आहे, तिला मतदान करा... मला सांगा तुमच्या कुटुंबातील एखादा व्यक्ती प्लंबिंगचं काम करत असेल तर तुम्हाला त्याचं प्लंबरचं काम जमणार आहे का? इलेक्ट्रिशियन असलेला नवरा करतो, त्याचं काम तुम्हाल जमणार आहे का? त्यामुळे ज्याचं काम त्याने करावं. धनंजय महाडिक यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे. वाचा : वीज कापल्याने भाजप आमदाराचा संताप, वीज कर्मचाऱ्याला इन्कम टॅक्स रेडची धमकी, Audio Clip Viral धनंजय महाडिक यांचे स्पष्टीकरण महिलांचा कोणत्याही पद्धतीने अपमान केला नसून माझ्या वाक्याचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्टीकरण माजी खासदार धनंजय महाडिक यांनी दिलंय. माझ्या निषेधाचा इव्हेंट करताना मंत्र्यांनी महिलांचे कुंकू पुसून काळे लावल्याची जहरी टीकाही त्यांनी यावेळी सतेज पाटील यांचे नाव न घेता केली. तर हे मंत्री मनोरुग्ण झाले असून त्यांना रत्नागिरीत जाऊन उपचार घेण्याची गरज असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. धनंजय महाडिक यांच्या या स्पष्टीकरणानंतर आता महाडिक आणि सतेज पाटील यांचा वाद चांगलाच चिघळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे भाजपचे आमदार बबनराव लोणीकर (BJP MLA Babanrao Lonikar) यांचीही एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये बबनराव लोणीकर महावितरणच्या इंजिनिअरला शिवीगाळ करुन धमकावत आहेत. ही क्लिप व्हायरल होताच ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनीही कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आमदार बबनराव लोणीकरांचे स्पष्टीकरण ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यावर आमदार बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यासोबतची एक कॉल रिकॉर्डिंग सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सदर रिकॉर्डिंग बनावट असून मला बदनाम करण्यासाठी ही बनावट क्लिप विरोधकांकडून व्हायरल केली जात असल्याचं स्पष्टीकरण भाजपचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी दिलं आहे. वाचा : महावितरण अधिकाऱ्याला धमकावणं महागात पडणार? बबनराव लोणीकरांविरुद्ध कारवाईचे ऊर्जामंत्र्यांनी दिले आदेश औरंगाबादमध्ये माझे दोन बंगले असून त्याचे मीटर काढून नेल्याचे या क्लिपमध्ये म्हटले आहे. वास्तविक पाहता औरंगाबादमध्ये माझा फक्त एकच बंगला असून त्याचा मीटर आहे तसाच आहे. त्यामुळे मी तसं काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. यावरून सदर क्लिप बनावट असल्याचं स्पष्ट होते असंही आमदार बबनराव लोणीकर म्हणाले. हा वीज वितरण कंपनीच्या सक्तीच्या वीजबिल वसुलीला आमचा विरोध असून लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने जनहितार्थ आमची ही भूमिका आहे, मात्र आमचे विरोधक आम्हाला बदनाम करत असल्याचा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केला आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Kolhapur, Maharashtra News

    पुढील बातम्या