नदीचे पाणी वाहत असलेल्या पुलावरुन कोल्हापूरकरांचा जीवघेणा प्रवास, थरकाप उडवणारा VIDEO

नदीचे पाणी वाहत असलेल्या पुलावरुन कोल्हापूरकरांचा जीवघेणा प्रवास, थरकाप उडवणारा VIDEO

या धोकादायक वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने बंद करण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 23 जून : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने आता कुठे विश्रांती घेतली आहे. असे असले तरी अद्यापही संकट टळलेलं नाही. अनेक ठिकाणी नद्या ओसंडून वाहत आहेत. त्यात शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट उभं राहिलं आहे. त्यातच कोल्हापूरमधून एक धक्कादायत व्हिडीओ समोर आलं आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरल्याने कसबा बावड्यातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी कमी झाली आहे. मात्र अजूनही नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या पाण्यातूनच वाहनधारकांची धोकादायक वाहतूक सुरू आहे. कसबा बावडा ते वडणगे मार्गावर ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी प्रवाह असलेल्या या पाण्यातूनच सकाळपासून वाहतूक सुरू केली आहे. या धोकादायक वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी हा मार्ग बंद करणं गरजेचं बनल आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणीपातळी 34 फुटांवर गेली होती. त्यामुळे कसबा बावड्यातील या राजाराम बंधाऱ्यावर आठ ते दहा फूट पाणी होतं. सध्या मात्र पावसाने उघडीप दिल्याने नदीची पाणी पातळी कमी होत आहे.

हे ही वाचा-कोल्हापूर: पाणी प्रश्नावर निघणार तोडगा, निवडणुकीच्या तोंडावर मुश्रीफांची घोषणा

गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापूर भागात मुसळधार पाऊस पडला होता. यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीतील धोक्याची पातळी पार करण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तर सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळं दोन बंधारे आणि एक पूलदेखील पाण्याखाली गेले बोके. त्याचबरोबर शिराळा तालुक्यातील आणखी दोन बंधारे पाण्याखाली गेले होते.

Published by: Meenal Gangurde
First published: June 23, 2021, 5:55 PM IST

ताज्या बातम्या