Home /News /kolhapur /

Kolhapur News: 'तो' चक्क महिलांचे कपडे करायचा चोरी; पकडताच धक्कादायक कारण आले समोर

Kolhapur News: 'तो' चक्क महिलांचे कपडे करायचा चोरी; पकडताच धक्कादायक कारण आले समोर

कोल्हापुरात एका तरुणाला कपडे चोरी प्रकरणात अटक केली आहे. त्याला अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    कोल्हापूर, 20 जानेवारी : सोने-चांदी, पैसे, गाडी किंवा इतर महागड्या वस्तुंची चोरी झाल्याचं तुम्ही आतापर्यंत ऐकलं असेल. पण कोल्हापुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. कपडे चोरी केल्या प्रकरणी एका 30 वर्षीय तरुणाला अटक (30 year old youth arrested) करण्यात आली आहे. कोल्हापुरातील भुदरगड (Bhudargad Kolhapur) येथील ही घटना आहे. न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कुटुंबाचेच कपडे चोरी होत होते आणि या प्रकरणात संबंधित तरुणाला रंगेहाथ अटक केली आहे. त्याला अटक करण्यात आल्यानंतर आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. झालं असं की, गेल्या महिन्याभरात सकाळी आवारात वाळत टाकलेले कपडे अचानक गायब होत होते. हे कपडे अचानक गायब कसे होतात असा प्रश्न न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबीयांना पडला होता. पहिल्यांदा कपड्यांची चोरी डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घडली होती. त्यानंतर असाच प्रकार तीन ते चार वेळा घडला होता. वाचा : स्वर्णवला भेटण्यापूर्वीच काळानं गाठलं, भाच्याला भेटण्यासाठी निघालेल्या आत्याचा अपघाती मृत्यू न्यायाधीशांनी या संदर्भात भुदरगड पोलिसांशी संपर्क साधून त्यांच्या निवासस्थानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चोर कंपाऊंडच्या भिंतीवरुन उडी मारुन आवारात वाळत घातलेल्या कपड्यांकडे जाताना दिसला. हे कपडे घेऊन चोराने पळ काढला. सोमवारी पहाटेच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाच्या दोन कर्मचाऱ्यांनी या आरोपीला पकडले असून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला कोल्हापूर सत्र न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वाचा : वाळत घातलेले कपडे चोरून न्यायाधीशांना आणलं नाकीनऊ धक्कादायक माहिती आली समोर टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, तपास अधिकारी आणि पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांनी सांगितले की, "सुशांत सदाशिव चव्हाण असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो भुदरगड तालुक्यातील गारगोटी येथील निवासी आहे. तो 30 वर्षीय आहे." सुशांत चव्हाण याला काही मानसिक त्रास असल्याचे त्याच्या आईने पोलिसांना सांगितले. तो पहाटे उठायचा आणि कपडे चोरायचा. विशेषत: महिलांचे कपडे चोरी करुन तो स्वत: पेहराव करायचा आणि नंतर फेकून द्यायचा. तो मानसिकदृष्ट्या आजारी आहे की नाही हे तपासण्यासाठी आम्ही वैद्यकीय तपासणी करणार आहोत असेही मयेकर यांनी सांगितले. पोलीस उपनिरीक्षक सतीश मयेकर यांनी पुढे सांगितले की, संशयिताच्या आईने सांगितले की, तो लहान असताना त्याच्या डोक्यात कुणीतरी दगड मारला होता. लहानपणापासूनच तो विचित्र गोष्टी करतो. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, तो दररोज पहाचे 4 वाजता अचानक उठतो आणि नंतर काय करतो ते आठवत नाही.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Kolhapur

    पुढील बातम्या