Home /News /kolhapur /

Kolhapur: महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमुळे कोल्हापुरात खळबळ

Kolhapur: महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाईड नोटमुळे कोल्हापुरात खळबळ

Kolhapur news: कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने टोकाचं पाऊल उचलंत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.

  ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 17 एप्रिल : कोल्हापुरातील (Kolhapur) एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट (Woman police constable suicide) केला आहे. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. कसबा बावडा येथे आपल्या राहत्या घरात योगिनी पवार (Yogini Pawar) यांनी गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगिनी पवार या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. (Kolhapur Police Constable Yogini Pawar committed suicide by hanging self) प्राथमिक माहितीनुसार, योगिनी सुकुमार पवार या कसबा बावडा येथे असलेल्या पोलीस लाईनमध्ये वास्तव्यास होत्या. आपल्या कुटुंबासोबत त्या तेथे राहत होत्या. कौटुंबिक वादातून आणि पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. या घटनेची माहिती मिळातच पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल झाली. वाचा : सेल्फी घ्यायला गेला आणि बंधाऱ्यात पडला; मित्रांच्या डोळ्यासमोर पुण्यातील तरुण बुडाला सुसाईड नोटमध्ये काय? मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी योगिनी पवार यांनी एक सुसाईड नोट लिहिली होती. ही चिठ्ठी त्यांच्या घरात आढळून आली आहे. आपल्या पतीकडून होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत लिहिलं आहे. या सुसाईड नोटच्या आधारे पोलिसांनी योगिनी पवार यांच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पुण्यात वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यानं संपवलं जीवन काही दिवसांपूर्वी पुण्यात भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत असणाऱ्या एका महिला अधिकाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली होती. ही खळबळजनक घटना ताजी असताना, डिसेंबर महिन्यात पुण्यातील आणखी एका वरिष्ठ पदावरील माहिला पोलीस अधिकाऱ्याने आत्महत्या केली. संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरात ओढणीनं गळफास घेत आयुष्याचा शेवट केला आहे. दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस येताच पोलीस प्रशासनाला धक्का बसला आहे. या घटनेची माहिती मिळताच वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. शिल्पा चव्हाण असं आत्महत्या करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याचं (senior Police inspector Shilpa Chavhan suicide) नाव असून त्या पुणे शहर पोलीस दलात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होत्या.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Kolhapur, Maharashtra police, Suicide

  पुढील बातम्या