Home /News /kolhapur /

WhatsApp डीपी न ठेवल्याने प्रियकराकडून मारहाण; रागाच्या भरात तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, कोल्हापुरातील खळबळजनक घटना

WhatsApp डीपी न ठेवल्याने प्रियकराकडून मारहाण; रागाच्या भरात तरुणीने उचललं टोकाचं पाऊल, कोल्हापुरातील खळबळजनक घटना

WhatsApp डीपी न ठेवल्याने प्रियकराकडून मारहाण; रागाच्या भरात तरुणीने असं काही केलं की... कोल्हापूर जिल्हा हादरला

WhatsApp डीपी न ठेवल्याने प्रियकराकडून मारहाण; रागाच्या भरात तरुणीने असं काही केलं की... कोल्हापूर जिल्हा हादरला

WhatsApp DP reason of clash: व्हॉट्सअप डीपी न ठेवल्याने प्रियकराने आपल्या प्रेयसीला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे.

  ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 29 एप्रिल : प्रेयसीने व्हॉट्सअप डीपी (WhatsApp DP) न ठेवल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने तिला बेदम मारहाण (Girlfriend beaten by boyfriend) केली. या घटनेनंतर रागाच्या भरात पीड़ित मुलीने टोकाचं पाऊल उचलत आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात (Aajra Taluka Kolhapur) ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात राहणाऱ्या एका मुलाचं ओळखीच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ही मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. किशोर सुरंगे असे तरुणाचे नाव आहे. त्याने आपल्या प्रेयसीला व्हॉट्सअप डीपी न ठेवल्याने आजरा बस स्थानकाच्या परिसरात मारहाण केली होती. प्रियकराने आपल्याला मारहाण केल्याने ही मुलगी नाराज झाली. त्यानंतर तिने घरी येत नैराश्येत गळफास घेतला. या घटनेत मुलीचा मृत्यू झाला आहे. या मुलीने व्हॉट्सअप डीपी न ठेवल्याने तिला किशोर याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. वाचा : शिवसेना खासदार भावना गवळींना ईडीचं समन्स, हजर न झाल्यास अटक होणार? मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आणि या मुलीचे प्रेमसंबंध होते. दोघांच्या घरच्यांमध्ये लग्नाचंही बोलणं झालं होतं. मात्र, मुलगी अल्पवयीन असल्याने तिच्या कुटुंबीयांनी काही दिवस थांबण्यास सांगितले. त्याच दरम्यान काही दिवसांपूर्वी किशोर याने या मुलीला मारहाण केली. आपला फोटो डीपीवर ठेव असा तगादा त्याने मुलीच्या मागे लावला होता. फोटो डीपीवर न ठेवल्याने त्याने या मुलीला बेदम मारहाण केली. महिला कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या कोल्हापुरातील एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या घटनेने कोल्हापुरात एकच खळबळ उडाली. कसबा बावडा येथे आपल्या राहत्या घरात योगिनी पवार यांनी गळफास घेत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, योगिनी पवार या कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होत्या. प्राथमिक माहितीनुसार, योगिनी सुकुमार पवार या कसबा बावडा येथे असलेल्या पोलीस लाईनमध्ये वास्तव्यास होत्या. आपल्या कुटुंबासोबत त्या तेथे राहत होत्या. कौटुंबिक वादातून आणि पतीकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचं पाऊल उचललं आहे.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Boyfriend, Crime, Girlfriend, Kolhapur, Whatsapp

  पुढील बातम्या