मोठी बातमी! शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा तिसऱ्यांदा स्थगित

मोठी बातमी! शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा तिसऱ्यांदा स्थगित

शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University, Kolhapur) परीक्षा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आल्या आहेत.

  • Share this:

कोल्हापूर, 06 एप्रिल: शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University, Kolhapur) परीक्षा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आल्या आहेत. हिवाळी सत्रातील (Winter Session Exam) सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या (Coronavirus Pandemic) पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठ प्रशासनानं पत्रक जारी करत याबाबत सूचना दिली. रात्री उशिरा विद्यापीठानं पत्रक जारी केलं आणि परिक्षा स्थगित केल्या आहेत. 6 ते 12 एप्रिल दरम्यान परीक्षा या होणार होत्या.

गेल्या वर्षभरात तिसऱ्यांदा शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. शैक्षणिक वर्ष 2020-21 मधील ऑक्टोबर/नोव्हेंबर 2020 हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा महाविद्यालयीन आणि विद्यापीठ स्तरावर 22 मार्चपासून ऑनलाइन/ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत.  मात्र आता कोरोनासंदर्भात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे 6 ते 12 एप्रिलदरम्यानच्या सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याचे या पत्रकात नमुद करण्यात आले आहे.

दरम्यान या परिपत्रकात असे नमुद करण्यात आले आहे की, स्थगित करण्यात आलेल्या परीक्षांबाबतच्या नव्या तारखा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्या निर्देशानुसार लवकरच जाहीर केल्या जातील.

(हे वाचा-VIDEO: 'बोर्डाची परीक्षा Online हवी यासाठी मुंबई, पुण्याचे विद्यार्थी रस्त्यावर)

कोरोनामुळे गेल्या आणि या शैक्षणिक वर्षात अतोनात नुकसान झाले आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी ऑनलाइन अभ्यासक्रमाशी जुळवून घेण्यासाठी अनेक प्रयत्न करत आहेत. आता कुठे विद्यार्थ्यांच्या शाळा-कॉलेज पूर्वीसारखं होतील अशी आशा निर्माण झाली होती. मात्र लॉकडाऊनच्या शक्यतेमुळे आता ती आशाही धुसर झाली आहे.

Published by: Janhavi Bhatkar
First published: April 6, 2021, 8:21 AM IST
Tags: kolhapur

ताज्या बातम्या