Home /News /kolhapur /

VIDEO : छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणींचा भव्य रथोत्सव, कोल्हापुरातला डोळे दिपवणारा कार्यक्रम

VIDEO : छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणींचा भव्य रथोत्सव, कोल्हापुरातला डोळे दिपवणारा कार्यक्रम

राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दीला आजपासून सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या रथोत्सवाने आज रात्री आठ वाजेपासून या राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरुवात झाली.

    कोल्हापूर, 18 एप्रिल : राजर्षी शाहू महाराज स्मृतीशताब्दीला आजपासून सुरुवात झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या रथोत्सवाने आज रात्री आठ वाजेपासून या राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरात काल अंबाबाईचा रथोत्सावाचा कार्यक्रम पार पडला होता. त्यानंतर आज छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा अभूतपूर्व रथोत्सव संपन्न झाला. या रथोत्सवाच्या कार्यक्रमात शेकडो कोल्हापूरकर सहभागी झाले. जोतिबाची यात्रा झाल्यानंतर अंबाबाईची रथोत्सव असतो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शिवाजी महाराज आणि महाराणी ताराराणी यांचा रथोत्सव आयोजित करण्यात येतो. या रथोत्सवाला छत्रपती शाहू महाराज यांनी सुरुवात केली होती. तेव्हापासून ही परंपरा सुरुच आहे. या रथोत्सवाला शाहू महाराज छत्रपती, मालोजीराजे छत्रपती, संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे पुत्र उपस्थित होते. या रथोत्सवात वेगवेगळ्या संस्था, सामाजिक संघटना, कोल्हापुरातील वेगवेगळी मंडळ आणि तरुण सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमावेळी जुना राजवाड्यासमोर नागरिकांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. शेकडो नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारलेला होता. (राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यात हजारो कार्यकर्ते सहभागी होणार, मनसे करणार राज्यभरातून दहा ते बारा ट्रेन बुक) रथोत्सवाच्या सुरुवातीला छत्रपती घराण्याचे सर्व सदस्य पुढे आले आणि त्यांनी रथ ओढला. मोठ्या शाही थाटात रथ पुढे सरकरत गेला. पुष्पवृष्टी , ढोल-ताशांचा गजरात रथ पुढे सरकत गेला. शिवाजी महाराजांचा रथ फुलांनी सजविण्यात आलेला होता. जुन्या राजवाड्याच्या आवारातून हा रथ बाहेर पडला. रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशानाने सर्व गोष्टींची सुविधा केलेली होती. गर्दीत गैरप्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा फौजफाटा होता. पोलिसांकडून योग्य ती सर्व प्रकारची काळजी घेतली गेली. रथोत्सवात शेकडो तरुणांनी भाग घेतला होता. ढोल-ताशांचा गजर, तालीम, फटाक्यांची आतिषबाजी या सर्वांच्या संमिश्राने मोठ्या जल्लोषात हा रथोत्सव पार पडला. या रथोत्सावात शेकडो तरुण हे ढोल-ताशांच्या तालावर थिरकले. संभाजीराजे छत्रपती यांनी या रथोत्सावाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. "राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज व रणरागिणी महाराणी ताराबाई साहेबांचा इतिहास सर्वसामान्यांना समजावा, यासाठी श्री जोतीबा यात्रेच्या तिसऱ्या दिवशी रथोत्सव साजरा करण्याची परंपरा निर्माण केली. आजही श्री छत्रपती देवस्थान ट्रस्टच्यावतीने कोल्हापूर येथे हा रथोत्सव प्रतिवर्षी भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो", असं संभाजीराजे म्हणाले आहेत.

    तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या