'मास्क काढा भावानो, कोरोना बिरोना काय नाय' बोंबलत फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांचा कोल्हापुरी झटक! VIDEO

'मास्क काढा भावानो, कोरोना बिरोना काय नाय' बोंबलत फिरणाऱ्या तरुणाला पोलिसांचा कोल्हापुरी झटक! VIDEO

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून क्रेझ तयार करणाऱ्या या तरुणाला हा प्रयोग चांगलाच महागात पडला आहे.

  • Share this:

कोल्हापूर, 12 मे :  'जगात कोरोना (Corona) वगैरे काही नाही.. मामा! मास्क काढा, तुम्ही आमची पावडर करायला लागलाय काय? खुशाल जगा', असं सांगत कोल्हापूरमध्ये (Kolhapurr) रस्त्यावर मोकाटपणे फिरणाऱ्या तरुणाला कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) चांगलाच कोल्हापुरी इंगा दाखवला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुहास पाटील (Suhash Patil) असं तरुणाचं नाव आहे. या पठ्याने आपल्या मित्राला आपल्या स्कुटीवर बसवून एक व्हिडीओ फेसबुकवर लाईव्ह केला आहे. रस्त्यात जी लोकं भेटतील, त्यांना तो मास्क न घालण्याचे सांगत होता.

रस्त्यात एका रुग्णवाहिकेतून कोरोनाबाधित नेण्यात येत होते, त्यावेळी तिथे पोहोचून कोरोना वगैरे काय नसतो, मास्क घालू नका. एवढंच नाहीतर कोविड खरंच झालाय का, असा उलट सवाल रुग्णांच्या नातेवाईकांना विचारत होता.

थोडं पुढे जाऊन सुहासने कोल्हापूर महापालिकेची केएमटी ऑक्सिजन सेवा करणारी बस एका मार्गावर अडवली. विरोध दिशेनं का आलात, असा सवाल करून त्याने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनाच दमदाटी सुरू केली. बसमधील  कर्मचारी त्याची समजूत काढण्यासाठी खाली उतरले तेव्हा, त्यांचा मास्क खाली ओढण्याचा प्रयत्न केला, बस थांबवून कोरोना वगैरे नाही असा प्रचार त्याने केला होता.

भावाला Oxygen Cylinder न मिळाल्याच्या रागात जवानाकडून मंत्र्यांना धमकी

त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून क्रेझ तयार करणाऱ्या या तरुणाला हा प्रयोग चांगलाच महागात पडला आहे. या प्रकरणी सुहास पाटील या तरुणावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. केएमटी प्रशासनाच्या वतीने अशोक खाडे यांनी पोलिसात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून सुहास पाटीलवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Published by: sachin Salve
First published: May 12, 2021, 1:59 PM IST
Tags:

ताज्या बातम्या