Home /News /kolhapur /

Uddhav Thackeray: तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्वाला सोडलं असं नाही, फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं उत्तर

Uddhav Thackeray: तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्वाला सोडलं असं नाही, फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं उत्तर

तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्वाला सोडलं असं नाही, फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं उत्तर

तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्वाला सोडलं असं नाही, फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं उत्तर

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रसारासाठी उद्धव ठाकरेंनी ऑनलाईन संबोधित केलं. यावेळी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.

    कोल्हापूर, 10 एप्रिल : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur north assembly by election) आज उद्धव ठाकरे यांनी ऑनलाईन माध्यमातून सभेला संबोधित केलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. रामाचा अवतार झालाच नसता तर... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोल्हापूर हा भगव्याचा बालेकिल्ला आहे. आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. काल नानांच्या प्रचाराला फडणवीस येऊन गेले. बऱ्याचदा असं होतं की, आपल्याकडे बोलण्यासाठी काही मुद्दे नसतील तर खोटे आरोप करायचे, एक भ्रम निर्माण करायचा आणि आपलं घोडं कुठे पुढे सरकतं याकडे पहायचं ही यांची एक वाईट सवय झाली आहे. कधी-कधी असा विचार येतो की, आज राम नवमी आहे प्रभू रामचंद्रांचा अवतार झालाच नसता तर यांचं राजकारण कसं झालं असतं. कुठल्या मुद्द्यावर राजकारण केलं असतं. स्वत:च्या कर्तृत्वाचं सांगण्यासारखं काहीच नाहीये यांच्याकडे... मग धार्मिक मुद्दे पुढे कर, द्वेष पसरवणारे पुढे कर हे असं काही करायचं आणि आपलं इच्छित असेल ते साध्य करायचं. खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, अनेकदा वाटतं की जे खोटं रेटून बोलत आहेत ते रेटून बोललं त्यामुळे खरं आहे की काय? आम्ही कमी कुठे पडलो का? अजिबात नाही.. सरकार म्हणून प्रशासकीय मदतीसाठी कमी पडलो का? अजिबात नाही.. मग तरी कमी पडलो तर कुठे कमी पडलो... तर खोटं बोलण्यात कमी पडलो. कमी पडलो तरी चालेल पण खोटं बोलणार नाही, खोटं बोलणं आमच्या रक्तात नाही. वाचा : 2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही? आकडेवारीसह उद्धव ठाकरेंचा सवाल तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडंल नाही लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरकरांनी एक छान घोषणा दिली होती. आमचं ठरलंय म्हणजे काय... जे ठरलं होतं ते त्यांनी करु दाखवलं. आमचं ठरलंय म्हणत काँग्रेस-राष्ट्रवादीने केलं होतं. कोल्हापुरातून भगवा घेऊन एक खासदार आपण दिल्लीत पाठवला. त्यानंतर काय झालं? जे आता बोंबलतायत की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं. कसं काय सोडलं? तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्व सोडंल नाही, तुम्ही म्हणजे हिंदुत्व नाही. तुम्ही काय हिंदुत्वाचं पेटंट घेतलेलं नाहीये असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    पुढील बातम्या