Home /News /kolhapur /

2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही? आकडेवारी जाहीर करत उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल

2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही? आकडेवारी जाहीर करत उद्धव ठाकरेंचा रोखठोक सवाल

2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही? आकडेवारीसह उद्धव ठाकरेंचा सवाल

2019 मध्ये भाजपने काँग्रेसला कोल्हापुरात छुपी मदत केली होती की नाही? आकडेवारीसह उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर छुप्या पद्धतीने काँग्रेसला मदत केल्याचा आरोप केला आहे.

    कोल्हापूर, 10 एप्रिल : कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी (Kolhapur by election) आज मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऑनलाईन माध्यमातून सभेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपवर विविध मुद्द्यांवरुन निशाणा साधला आहे. तसेच भाजपने काँग्रेसला 2019च्या निवडणुकीत कोल्हापुरात छुपी मदत केल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे. अचानक युती काय तोडली? 2014 आणि 2019 च्या निवडणुकीतील मतांची आकडेवारी उद्धव ठाकरेंनी सांगत म्हटलं, 2014 ला युती तोडताना काय म्हणून तुम्ही युती तोडली होती? आम्ही नव्हती तोडली.. अगदी अर्ज भरायचा शेवटच्या दिवसापूर्वी एकनाथ खडसेंचा फोन आला... उद्धवजी आपलं काही जुळेल असं वाटत नाही आपण स्वतंत्र लढलेलं बरं. युती संदर्भात जागा वाटप होत आलं होतं पण अचानक असं काय घडलं त्यावेळेला... आमच्या हातात भगवा होताच. भाजपचे 40 हजार मते गेली कुठे? 2014 ला निवडणुकीत काय झालं? तेव्हा राजेश आपण जिंकलात. 2014 ला शिवसेनेला मिळाली होती 69736 मते, भाजपला 40104 मते आणि काँग्रेसला 47315 मते. यानंतर 2019 ला आपली युती झाली. युती झाल्यावर काय झालं? भाजपला जी मते मिळाली होती 40 हजार त्यातील 40 नाही पण 35 हजार, 30 हजार किंवा 20 हजार तर मिळायला हवी होती ना. पण आपल्याला किती मिळाली तर 75854 मते. म्हणजेच जेमतेम 5 हजार मते वाढली. भाजप आपल्यासोबत युतीत होता मग त्यांची 40 हजार मते गेली कुठे? कुठे गेली ही मते, पंचगंगेतील दुषित पाण्यासारखं तुमच्या मतांमध्ये प्रदुषण झालं का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. वाचा : तुम्हाला सोडलं म्हणजे हिंदुत्वाला सोडलं असं नाही, फडणवीसांना उद्धव ठाकरेंचं उत्तर शिवसेना समोरून वार करते आता पोटनिवडणुकीत जयश्रीताई जाधव निवडून येणारच... कारण शिवसेना हा समोरून वार करते. पाठीमागून वार करत नाही. आम्ही जे करतो ते समोरासमोर. होय बोललो तर खरं करुन दाखवण्यासाठी वाट्टेल ते करु. पण पाठीत वार कधी करणार नाही असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही छुपं मत दिलं होतं की नव्हतं? पण 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेचा पराभव झाला. पण भाजपची 40 हजार मते जर शिवसेनेला तेव्हा मिळाली असती तर 1 लाख 10 हजार मते झाली असती. मग ती मते का नाही मिळाली. काँग्रेसची मते जी 47 हजार होती ती 91 हजार झाली म्हणजे 40 हजार मते तुम्ही फिरवली नाहीत कशावरुन? आज म्हणे शिवसैनिक काँग्रेसला मत देणार का? मग गेल्यावेळी तुम्ही छुपं मत दिलं होतं की नव्हतं? याचा खुलासा कोण करणार? तुम्ही जे छुपं करता.. आम्ही देशाच्या, राज्याच्या आणि कोल्हापूरच्या हितासाठी उघडपणे करत आहोत. पाठिंबा देतो तर उघडपणाने आणि विरोध करतो तो सुद्धा उघडपणाने असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Kolhapur, Uddhav thackeray

    पुढील बातम्या