Home /News /kolhapur /

Kolhapur Election 2022: उत्तर कोल्हापुरात मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Kolhapur Election 2022: उत्तर कोल्हापुरात मतदानाला सुरुवात, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

Kolhapur Assembly By Election: आज कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North Assembly constituency) मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

    कोल्हापूर, 12 एप्रिल: आज कोल्हापूर उत्तर विधानसभा (Kolhapur North Assembly constituency) मतदारसंघाची पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या पोटनिवडणुकीसाठी एकूण 2 हजार 142 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण 357 केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पडेल. या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसच्या (Congress) जयश्री पाटील रिंगणात आहेत. भाजपकडून (BJP) सत्यजित कदम निवडणूक लढवत आहेत. महाविकास आघाडीसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली असून दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. (Kolhapur Election 2022) मोठा पोलीस फाटा तैनात या मतदानासाठी 357 ईव्हीएम मशीन (EVM Machine) ठेवलेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात एकूण 7 संवेदनशील मतदान केंद्रं आहेत. एकूण 550 पोलीस कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तिथे तैनात केला आहे. या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला रविवारी प्रचाराच्या शेवटच्या दिग्गज नेत्यांच्या राजकीय सभा कोल्हापुरात पार पडल्या. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या सभेच्या प्रचारादरम्यान भाजप आणि काँग्रेस दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सभा घेतल्या. या सभेदरम्यान एकमेकांवर दावे- प्रतिदावे करण्यात आले. दोन्ही पक्षाकडून जोरदार प्रचार करण्यात आला आहे. काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोल्हापूरच्या जनतेला संबोधित केलं. तर दुसरीकडे दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीवस यांनीही प्रचारसभा घेत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Chandrakant patil, Kolhapur

    पुढील बातम्या