Home /News /kolhapur /

Kolhapur by election result live: उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल; काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय

Kolhapur by election result live: उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल; काँग्रेसच्या जयश्री जाधव यांचा दणदणीत विजय

North Kolhapur assembly by election result: उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली. या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

    ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 16 एप्रिल : पालकमंत्री सतेज पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या उत्तर कोल्हापूर पोटनिवडणुकीची मतमोजणी (North Kolhapur Assembly by election counting) आज होत आहेत. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर झालेल्या या जागेवर ही निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी देण्यात आली. तर भाजपने सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी दिली होती. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच जयश्री जाधव यांनी मोठी आघाडी घेतली आणि ही आघाडी कायम ठेवत विजय मिळवला आहे. जयश्री जाधव यांना 96176 मते मिळाली आहेत तर सत्यजीत कदम यांना 77426 मते मिळाली. सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवात झाली असून 26 फेऱ्यात मतमोजणी पार पडली. सतेज पाटलांच्या कसबा बावड्यातून मतमोजणीला सुरुवात झाल. काँग्रेस आणि भाजप यांच्यात प्रामुख्याने ही लढत झाली. अत्यंत चुरशीने याची प्रचार प्रक्रिया दोन्ही बाजूंनी राबवली गेली होती. निकालाचे LIVE अपडेट्स 26वी फेरी  काँग्रेस 1459 भाजप 1303 26व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव 18901 मतांनी आघाडीवर 25वी फेरी  काँग्रेस 2755 भाजप 2949 25व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव 18644 मतांनी आघाडीवर 24वी फेरी  काँग्रेस 5337 भाजप 2830 24व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव 18838 मतांनी आघाडीवर 23वी फेरी  काँग्रेस 3337 भाजप 2531 23व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव 16331 मतांनी आघाडीवर 22 वी फेरी काँग्रेस 3529 भाजप 3226 22व्या फेरीनंतर जयश्री जाधव 15525 मतांनी आघाडीवर 21 वी फेरी काँग्रेस 3452 भाजप 3662 20व्या फेरीनंतर जयश्री जाधव 15222 मतांनी आघाडीवर 20वी फेरी  काँग्रेस 4366 भाजप 3074 20व्या फेरी नंतर जयश्री जाधव 15432 मतांनी आघाडीवर 19वी फेरी काँग्रेस 3259 भाजप 2974 काँग्रेसच्या जयश्री जाधव 14140 मतांनी आघाडीवर 18वी फेरी काँग्रेस 3948 भाजप 3189 काँग्रेसच्या जयश्री जाधव 13855 मतांनी आघाडीवर 17 वी फेरी  काँग्रेस 2795 भाजप 3488 17व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची 13096 मतांनी आघाडीवर 16वी फेरी  काँग्रेस 3638 भाजप 3847 16व्या फेरीत भाजपला काँग्रेसहून अधिक मते मिळाली. खोल खंडोबा, शुक्रवार पेठ, शाहू उद्यान परिसरात काँग्रेसचे मताधिक्य घटले. 15वी फेरी काँग्रेस 3788 भाजप 2056 14व्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 13998 मतांनी आघाडीवर 14वी फेरी काँग्रेस 3756 भाजप 1087 14व्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 12266 मतांनी आघाडीवर 13वी फेरी  काँग्रेस 4386 भाजप 2432 13व्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 11,179 मतांनी आघाडीवर 12वी फेरी  काँग्रेस 3946 भाजप 2908 11वी फेरी काँग्रेस 2870 भाजप 2756 11व्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 8187 मतांनी आघाडीवर 10वी फेरी काँग्रेस 2868 भाजप 3794 9वी फेरी काँग्रेस 2743 भाजप 2937 9व्या फेरी अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव 8959 मतांनी आघाडीवर आठवी फेरी काँग्रेस 2981 भाजप 3505 आठव्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 9152 मतांनी आघाडीवर सातवी फेरी  काँग्रेस 3633 मते भाजप 2431 मते सातव्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 9576 मतांनी आघाडीवर सहावी फेरी काँग्रेस 4689 भाजप 2972 पाचवी फेरी काँग्रेस 3673 भाजप 4198 चौथी फेरी काँग्रेस 3719 भाजप 3937 तिसऱ्या फेरीतही काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची आघाडी कायम, तिसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना 4928 मते तर सत्यजीत कदम यांना 2566 मते, जयश्री जाधव 7501 मतांनी आघाडीवर दुसऱ्या फेरीतही काँग्रेसची आघाडी, दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना 5515 तर सत्यजित कदम यांना 2513 मते, दुसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव 5139 मतांनी आघाडीवर दुसऱ्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना 10371 मते मिळाली आहेत तर सत्यजीत कदम यांना 5224 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव 2137 मतांनी आघाडीवर, पहिल्या फेरी अखेर काँग्रेसला 4856 तर भाजपला 2719 मते सतेज पाटील यांच्या कसबा बावड्यातून काँग्रेसची आघाडी काँग्रेसच्या जयश्री जाधव आघाडीवर सकाळी 11 वाजेपर्यंत निकाल येण्याची शक्यता पोस्टल मतमोजणीला सुरुवात सकाळी 8 वाजता मतमोजणीला सुरुवात मतमोजणी प्रक्रियेत नियोजना अभावी गोंधळ, सकाळी 7 वाजल्यापासून थांबूनही आत सोडण्यात न आल्याने वादावादी, पोलीस आणि उमेदवार प्रतिनिधी यांच्यात वाद जयश्री जाधव यांचा अल्प परिचय काँग्रेसकडून जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. पती चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर जयश्री जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. विशेष म्हणजे जयश्री जाधव या भाजपच्या विद्यमान नगरसेविका आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांचे गेल्यावर्षी निधन झालं होतं. त्यामुळे कोल्हापूर उत्तर विधानसभेची जागा रिक्त झाली आणि या जागेवर आता पोटनिवडणूक घेतली. सत्यजीत कदम यांचा अल्प परिचय भाजपकडून सत्यजीत (नाना) शिवाजीराव कदम (Satyajeet Kadam) यांना उमेदवारी देण्यात आली. ते सध्या विद्यमान नरसेवक आहेत. सत्यजीत कदम हे 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढले होते. त्यामुळे पोटनिवडणुकीत भाजपच्या नगरसेविकेला काँग्रेसने तर काँग्रेसच्या 2014 च्या विधानसभेच्या उमेदवाराला भाजपकडून तिकीट असा अनोखा योगायोग जुळून आला.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Election, Kolhapur

    पुढील बातम्या