Home /News /kolhapur /

Kolhapur by-election: कोल्हापूर पोटनिवडणुकीत करुणा धनंजय मुंडेंना किती मते मिळाली माहितीये का? वाचा

Kolhapur by-election: कोल्हापूर पोटनिवडणुकीत करुणा धनंजय मुंडेंना किती मते मिळाली माहितीये का? वाचा

कोल्हापूर पोटनिवडणुकीत करुणा धनंजय मुंडेंना किती मते मिळाली माहितीये का? वाचा

कोल्हापूर पोटनिवडणुकीत करुणा धनंजय मुंडेंना किती मते मिळाली माहितीये का? वाचा

Kolhapur North by election: उत्तर कोल्हापूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

  ज्ञानेश्वर साळोखे, प्रतिनिधी कोल्हापूर, 16 एप्रिल : काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant Jadhav) यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी विजय मिळवला असून भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजप (MVA vs BJP) अशी झाली असली तरी या निवडणुकीत एका नावाची जोरदार चर्चा सुद्धा झाली आणि ते म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या करुणा धनंजय मुंडे यांची. करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhanajay Munde) यांनी ही निवडणूक लढली होती आणि त्यांना किती मते मिळाली माहिती आहे का? निवडणुकीचे निकाल आता समोर आले असून काँग्रेसच्या जयश्री जाधव या विजयी झाल्या आहेत. त्यांना 96176 मते मिळाली आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम हे आहेत. सत्यजीत कदम यांना 77426 मते मिळाली आहेत. जयश्री जाधव आणि सत्यजीत कदम यांच्यातच ही मुख्य लढत झाल्याचं पहायला मिळालं. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांकडूनही निवडणुकीत जोरदार प्रचार करण्यात आला. तसेच दोघांनीही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. वाचा : मुख्यमंत्र्यांच्या एका भाषणामुळे झाला भाजपचा गेम, वाचा नेमंक काय घडलं? करुणा धनंजय मुंडे- शर्मा यांना किती मते मिळाली? या निवडणुकीच्या रिंगणात करुणा शर्मा (Karuna Sharma) यांनीही उडी घेतली आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी करुणा शर्मा यांनी आपला अर्ज दाखल केला. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर करुणा शर्मा चर्चेत आल्या होत्या. त्यांनी आपला अर्ज करुणा धनंजय मुंडे या नावाने दाखल केला होता. मतमोजणीची जी आकडेवारी आली आहे त्यानुसार करुणा धनंजय मुंडे यांना निवडणुकीत 133 मते मिळाली आहेत. करुणा शर्मांची संपत्ती किती? करुणा शर्मा यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपला अर्ज दाखल करताना आपल्या संपत्तीची माहितीही जाहीर केली. करुणा शर्मा यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची नेमकी किती संपत्ती आहे याची माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार, करुणा शर्मा यांच्याकडे कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं दिसून येत आहे. करुणा शर्मा यांनी आपला अर्ज दाखल करताना धनंजय मुंडे यांच्या पत्नी असा उल्लेख केला आहे. वाचा : कोल्हापुरात BJP चा पराभव, आता हिमालयात जाणार का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं 'हे' उत्तर आपल्या प्रतिज्ञापत्रात करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्याकडे रोख 400000 रुपये असल्याचं म्हटलं आहे. तर विविध बँक अकाऊंट आणि इतर गुंतवणुकीची एकूण रक्कम पाहता कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. तर मध्यप्रदेशात इंदूर येथे बिगरशेती जमीन असून त्याचे एकूण आकारमान 2400 चौरस फूट इतके असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. या जागेवर झालेल्या बांधकामानंतर त्या जागेची बाजारभावानुसार किंमत ही 2,00,00,000 रुपये इतकी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यासोबतच मुंबईत असलेल्या फ्लॅटचाही उल्लेख केला आहे ज्याची किंमतही कोट्यवधी रुपयांच्या घरात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: Election, Kolhapur

  पुढील बातम्या