Home /News /kolhapur /

Kolhapur North Assembly by election: काँग्रेसची आघाडी अन् भाजपची पिछाडी, नेमकं काय घडलं?

Kolhapur North Assembly by election: काँग्रेसची आघाडी अन् भाजपची पिछाडी, नेमकं काय घडलं?

Kolhapur Assembly by election : आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये जवळपास 9 हजारांच्या मताधिक्यांनी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे.

    कोल्हापूर, 16 एप्रिल : उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला (North Kolhapur Assembly By election counting) सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव (Congress Candidate Jayashree Jadhav) यांनी आघाडी घेतल्याचं पहायला मिळत आहे. ही आघाडी अद्यापही कायम असून भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (BJP Candidate Satyajeet Kadam) हे पिछाडीवर आहेत. आत्तापर्यंतच्या मतमोजणीनुसार, जयश्री जाधव यांनी जवळपास 9 हजार मतांची आघाडी घेतली आहे. इतक्या मोठ्या आघाडीमुळे सत्यजीत कदम यांच्यासाठी विजय मिळवणं थोडं अवघड दिसू लागलं आहे. आतापर्यंतच्या फेऱ्यांमध्ये जवळपास 9 हजारांच्या मताधिक्यांनी काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली आहे. काँग्रेसने घेतलेली ही आघाडी सत्यजीत कदम यांना तोडणं मोठं आव्हान आहे. कारण, सत्यजीत कदम ज्या प्रभागातून नगरसेवक आहेत त्या प्रभागातून त्यांना मिळणाऱ्या मतांमुळे आघाडी घेतील असा अंदाज वर्तवण्यात येत होता. पण या प्रभागातून सत्यजीत कदम यांना अवघे 500 ते 600 मते जयश्री जाधव यांच्यापेक्षा अधिक मिळाली आहेत. त्यामुळे आतापर्यंत तरी जयश्री जाधव यांनी घेतलेली आघाडी ही सत्यजीत कदम यांना तोडण्यात अपयश आलं आहे. आता उर्वरित फेऱ्यांमध्ये सत्यजीत कदम हे जयश्री जाधव यांची आघाडी तोडण्यात यशस्वी ठरतात का हे पहावं लागेल. कोल्हापुरचा इतिहास पाहिला तर साधारणत: विधानसभा निवडणुकीत सहा ते सात हजार मतांची घेतलेली आघाडी ही तोडणं खूपच कठीण असतं. ही आघाडी कायम तशीच राहते. उच्चभ्रू परिसरातून भाजपला आघाडी मिळेल अशी काही अपेक्षा आहे. आता या भागातील मतमोजणीत सत्यजीत कदम यांना किती मते मिळतात हे पहावं लागेल. आत्तापर्यंतचे निकालाचे LIVE अपडेट्स 12वी फेरी काँग्रेस 3946 भाजप 2908 11वी फेरी काँग्रेस 2870 भाजप 2756 11व्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 8187 मतांनी आघाडीवर 10वी फेरी काँग्रेस 2868 भाजप 3794 9वी फेरी काँग्रेस 2743 भाजप 2937 9व्या फेरी अखेर काँग्रेसच्या जयश्री जाधव 8959 मतांनी आघाडीवर आठवी फेरी काँग्रेस 2981 भाजप 3505 आठव्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 9152 मतांनी आघाडीवर सातवी फेरी काँग्रेस 3633 मते भाजप 2431 मते सातव्या फेरी अखेरीस काँग्रेसच्या जयश्री जाधव 9576 मतांनी आघाडीवर सहावी फेरी काँग्रेस 4689 भाजप 2972 पाचवी फेरी काँग्रेस 3673 भाजप 4198 चौथी फेरी काँग्रेस 3719 भाजप 3937 तिसऱ्या फेरीतही काँग्रेसच्या जयश्री जाधव यांची आघाडी कायम, तिसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना 4928 मते तर सत्यजीत कदम यांना 2566 मते, जयश्री जाधव 7501 मतांनी आघाडीवर दुसऱ्या फेरीतही काँग्रेसची आघाडी, दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना 5515 तर सत्यजित कदम यांना 2513 मते, दुसऱ्या फेरीअखेर जयश्री जाधव 5139 मतांनी आघाडीवर दुसऱ्या फेरीअखेरीस जयश्री जाधव यांना 10371 मते मिळाली आहेत तर सत्यजीत कदम यांना 5224 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव 2137 मतांनी आघाडीवर, पहिल्या फेरी अखेर काँग्रेसला 4856 तर भाजपला 2719 मते सतेज पाटील यांच्या कसबा बावड्यातून काँग्रेसची आघाडी
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: BJP, Election, Kolhapur

    पुढील बातम्या