Home /News /kolhapur /

कोल्हापुरात BJP चा पराभव, आता हिमालयात जाणार का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं 'हे' उत्तर

कोल्हापुरात BJP चा पराभव, आता हिमालयात जाणार का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील यांनी दिलं 'हे' उत्तर

कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजप उमेदवार सत्यजीत कदम यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

  कोल्हापूर, 16 एप्रिल : उत्तर कोल्हापूर विधानसभा पोटनिवडणुकीत (North Kolhapur Assembly By election) महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांचा विजय झाला आहे. भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. या निवडणुकीत जयश्री जाधव यांना 96176 मते मिळाली तर सत्यजीत कदम यांना 77426 मते मिळाली. काँग्रेसचा विजय आणि भाजप उमेदवाराचा पराभव म्हणजे चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यासाठी हा एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे. तर तिकडे काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकडून विजयाचा गुलाल उधळला जात असून चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात येत आहे. चंद्रकांत पाटील हिमालया की गोद मे असे पोस्टर्स बनवत शिवसैनिकांनी डिवचलं आहे. काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील? काही दिवसांपूर्वी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलं होतं, "आज चॅलेंज लावतो... ज्याला असं वाटतं ना त्याने कोल्हापूर जिल्ह्यातील कुठल्याही विधानसभेचा राजीनामा द्यायचा. पोटनिवडणूक लावायची. निवडून नाही आलो ना... तर सरळ राजकारण सोडून हिमालयात निघून जाईल." वाचा : मुख्यमंत्र्यांच्या एका भाषणामुळे झाला भाजपचा गेम, वाचा नेमंक काय घडलं? आज काय म्हणाले चंद्रकांत पाटील? या विधानानंतर आज भाजप उमेदवाराच पराभव झाला आणि त्यानंतर या विषयावरुन शिवसैनिकांनी त्यांना डिवचलं. आहे. या निवडणूक निकालानंतर चंद्रकांत पाटील यांना प्रसारमाध्यमांनी हिमालयाच्या मुद्द्यावर विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही आत्तापर्यंत काय केलं आणि पुढे काय करणार या मुद्द्यांवर आम्ही निवडणूक लढली. हिमालयात जाण्याच्या विधानावर त्यांनी म्हटलं, मी काय करायचं हे मी आणि माझे श्रेष्ठी ठरवतील. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं, कोल्हापूर विधानसभेची पोटनिवडणूक ही तीन पक्ष विरुद्ध एक पक्ष अशी लढत झाली. आम्ही ही निवडणूक विकासावर लढलो. भविष्यात आम्ही काय करणार आहोत हा मुद्दा आम्ही प्रामुख्याने मांडला. दुसरा मुद्दा हिंदुत्वाचा... हिंदूत्व आमचा अजेंडा नाही हिंदूत्व आमचा श्वास आहे. राजकीय आवश्यकता म्हणून कुठल्या दुसऱ्या पक्षासारखं अचानक हिंदूत्वाचा मुद्दा मांडला नाही. वाचा : तीन पक्षांची एकी भाजपला पडली भारी अन् जयश्री जाधव झाल्या विजयी आमचे नाना कदम लढले आणि तुमच्या तोंडाला फेस आला मग मी लढलो असतो तर तुमचं काय होईल? मी असं म्हटलं होतं की, मी लढलो आणि मी जिंकलो नाही तर मी हिमालयात जाईल असं म्हटलं होतं. मी अजून लढायचो आहे ना.. असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

  तुमच्या शहरातून (कोल्हापूर)

  Published by:Sunil Desale
  First published:

  Tags: BJP, Election, Kolhapur

  पुढील बातम्या